महात्मा बसवेश्वर यांचे जाती आणि धार्मिक कर्मकांड विषयीचे विचार

महात्मा बसवेश्वर यांचे जाती आणि धार्मिक कर्मकांड विषयीचे विचार

संशोधनकर्ती

प्रा. गायत्री आर. सिरसाम,

गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय,

तुमसर

गोषवारा :- महात्मा बसवेश्वर हे कर्नाटक राज्यातील संत व समाज सुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि इतर समाज विघातक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.

     भारतातील प्रमुख आध्यात्मिक गुरु मध्ये त्यांची गणना होत असली तरी ते एक बंडखोर संत, कवी आणि कळकळीचे समाज सुधारक होते. महात्मा बसवेश्वर जरी आठशे वर्षांपूर्वीच्या काळातील असले तरी त्यांची शिकवण पूर्णपणे आधुनिक आणि व्यवहार्य असल्यामुळे आजही काळाशी सुसंगत वाटते. त्यांची शिकवण अनुसरली गेली असती तर भारतीय समाजाचे चित्र काही वेगळे असते. आध्यात्मिक साधने या काळात बसवेश्वराने लिहिलेली वचने म्हणजे त्यांच्या साक्षात कार्य अनुभवाच्या जिवंत दस्तावेज आहे.

     प्रस्तुत अध्ययनात महात्मा बसवेश्वरांचा वचनांच्या आधारे त्यांनी त्या काळात प्रस्थापित व्यवस्थेतील जातीव्यवस्था, धार्मिक कर्मकांडावर कशाप्रकारे प्रहार केला आहे. तसेच व्यवस्थेमध्ये कसे बदल घडवून आणले, आपल्या वचनाच्या माध्यमाने समाजाला कसे अज्ञानाकडून – ज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे, विषमतेकडून – समानतेकडे, देवालयाकडून – देहालयाकडे, देहकदंडनाकडून – देह धर्माकडे, ग्रंथ प्रमाण्यवादाकडून-बुद्धीप्रामाण्यवादाकडे घेऊन जाणारी नवी व्यवस्था निर्माण करणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. प्रस्तुत अध्ययनात महात्मा बसवेश्वरांचे वचने आजच्या आधुनिक भारतात जिथे जातीव्यवस्था संकेतात्मक स्वरूपात अस्तित्वात आहे तसेच धार्मिक कर्मकांड अजूनही अस्तित्वात आहे अशा समाजाशी महात्मा बसवेश्वर यांचे वचनाच्या सहसंबंध विशेद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जाती कर्मकांड आणि अंधश्रद्धा विरुद्ध च्या कार्याचा आढावा घेताना काही सामाजिक विचारवंतांच्या विचाराशी सहसंबंध जोडण्याच्या प्रयत्न या अध्ययनात करण्यात आलेले आहे.

बीजशब्द :- जात , धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धा, समाज व्यवस्था ,वचने.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P107

Download