भंडारा गोंदिया जिल्ह्यातील गोसावी समुदायातील स्त्रियांची निसर्गकेंद्रित जीवनशैली आंतर छेदनवादी विश्लेषण

भंडारा गोंदिया जिल्ह्यातील गोसावी समुदायातील स्त्रियांची निसर्गकेंद्रित जीवनशैली आंतर छेदनवादी विश्लेषण

प्रा. तुळशीदास  शामराव कोसे

स्व.निर्धनपाटील वाघाये महाविद्यालय

सौन्दड,जि.गोंदिया 

सारांश:-(Abstract)

        आदिवासी समुदायाचे निसर्गाशी असलेले संबंध हे अधिक गुंतागुंतीचे असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र बनले आहे. महाराष्ट्रातील भंडारा- गोंदिया हा प्रदेश आदिवासी संस्कृतीचा गाभा मानला जातो. अशा या नैसर्गिक वातावरणात वैदिक आणि आदीशंकराचार्याच्या परंपरेतील एक भटका साधू/ यती समाज म्हणून ऐतिहासिक पाया असलेला गोसावी समाज वास्तव्यास आहे. गोसावी जमातीतील स्त्रिया या निसर्गकेंद्रित ज्ञानाच्या संवाहक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे हा विषय संशोधन दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट आहे की, गोसावी समाजातील स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील निसर्ग- केंद्रित व्यवहार, ते व्यवहार कोणत्या सामाजिक- सांस्कृतिक तत्त्वावर आधारित आहेत आणि ते आंतरछेदनवादी दृष्टिकोनातून व पर्यावरण ज्ञान सिद्धांताचा आधार घेऊन लिंग, जमाती ओळख, वर्ग आणि भौगोलिक सीमा यांच्या परस्पर संबंधात कसे रुजलेले आहेत. हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    प्रस्तुत संशोधन विश्लेषणासाठी स्त्रियांच्या बदलाचा संक्रमण काळ लक्षात घेता किंबर्ले क्रेनशा यांचा आंतरछेदनवादी सिद्धांताचा तर सामाजिक दृष्ट्या वंचित गटाकडे कसे असमान वितरण केले गेले यासाठी बरकेस यांचा पर्यावरणीय न्याय सिद्धांताचा आधार घेण्यात आला. सदर संशोधनासाठी दस्ताऐवजांचे मजकूर विश्लेषणाचा अंतर्भाव करण्यात आला. त्यातून अपेक्षित परिणाम पुढीलप्रमाणे सांगता येतील.

1) स्त्रियांची निसर्ग-केंद्रीत जीवनशैली त्यांच्या सामाजिक – आर्थिक स्थिती, कुटुंबातील निर्णय प्रक्रिया आणि समुदायातील स्थान यांच्याशी कशी गुंतलेली आहे हे आंतरछेदनवादी दृष्टिकोनातून स्पष्ट केल्या जाईल.

2) आधुनिकीकरण, शहरीकरण आणि हवामान बदलासारख्या आव्हानांमुळे या पारंपरिक ज्ञान आणि व्यवहारावर कसा दबाव येत आहे, तसेच त्यांची अनुकूलन क्षमता तपासता येईल.

     हा अभ्यास केवळ एक विशिष्ट समुदायापुरते मर्यादित नाही, तर जमातीतील स्त्रियांचे ज्ञान सामर्थ्य आणि अनुकूलन क्षमतेची एक जटिल प्रतिमा निर्माण करेल, जेणेकरून नवीन ध्येय- धोरणांचा कळस रचला जाऊ शकेल.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P094

Download