विकसित भारतासाठी भारतीय ज्ञान प्रणाली
प्रा. श्रीपाद श. नायब
सहाय्यक प्राध्यापक,
स्वामी विवेकानंद समाज कार्य महाविद्यालय,महाल नागपूर
प्रस्तावना
भारतीय ज्ञान म्हणजे भारतात प्राचीन काळापासून विकसित झालेली समग्र, मूल्याधिष्ठित आणि जीवनाभिमुख ज्ञानपरंपरा होय. ही संकल्पना केवळ ग्रंथाधारित किंवा बौद्धिक ज्ञानापुरती मर्यादित नसून मानवाचे संपूर्ण जीवन समजून घेणारी व घडविणारी व्यवस्था आहे. भारतीय ज्ञान व्यवस्थेत ज्ञानाचा उद्देश माहिती संकलन नसून सत्याची अनुभूती, आत्मविकास आणि समाजकल्याण हा आहे. विकसित भारताची संकल्पना केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून ती समग्र, शाश्वत आणि मूल्याधिष्ठित विकासावर आधारित आहे. या दृष्टीने भारतीय ज्ञान व्यवस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ती शरीर–मन–बुद्धी–आत्मा यांचा संतुलित विकास, मूल्याधिष्ठित शासन, विज्ञान–अध्यात्माचा समन्वय, पर्यावरणाशी सुसंवाद, शिक्षणातून सद्गुणी व कुशल मनुष्यबळनिर्मिती, आत्मनिर्भरता, सामाजिक सलोखा आणि मानसिक आरोग्य यांना चालना देते. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाला भारतीय ज्ञानाच्या नैतिक आणि मानवकेंद्रित दृष्टीची जोड मिळाल्यास भारत शाश्वत, सुसंवादी आणि समृद्ध विकसित राष्ट्र म्हणून उभा राहू शकतो.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P080
Download