भारतीय समाजव्यवस्था (प्राचिन आणि आधुनिक) आणि संविधान
प्रकाश मोतीराम मेश्राम
पीएच.डी.विद्यार्थी (समाजशास्त्र विभाग)
प्रा. डॉ. अशोक ता. बोरकर
समाजशास्त्र विभाग प्रमुख
रा.तु.म. नागपूर, विद्यापीठ नागपूर
- सारांश –
भारतीय समाजव्यवस्थेत (समाजरचनेत) त्या त्या काळानुसार बदल झालेले दिसून येतात. ही समाजव्यवस्था स्थिर स्वरूपाची असलेली दिसून येत नाही. कधी समाजरचनेत समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय दिसून येते तर कधी ती विषमतेवर आधारित दिसून येते. त्याचे प्रतिबिंब आणि सुधारणा हया भारतीय संविधानात आपणास दिसून येतात. भारतीय संविधान हे लोकशाहीवादी तसेच कल्याणकारी आहे. जे प्रत्येक नागरिकाला अनेक हक्क-अधिकार प्राप्त करुन देण्यास कटीबद्ध आहे. भारतीय संविधानाने विषमतेला नाकारुन समातावादी समाजरचना निर्माण करण्यास महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. समाजात असलेल्या वाईट, चालीरिती, प्रथा, परंपरा यांना नाकारुन नवा समतावादी समाज निर्माण करणे हे उद्दिष्ट संविधानाने ठरविले आहे. त्याकरिता संविधानाने प्राचिन तसेच आधुनिक काळातील उच्च नैतिक मूल्यांचा स्विकार केलेला आहे. त्याद्वारे नागरिकांना आपला विकास करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. प्रस्तुत अध्ययनात भारतीय समाजव्यवस्था आणि संविधानाच्या तुलनात्मक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
- मुख्य बिंदू – भारतीय समाजरचना, भारतीय संविधान
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P053
Download