सत्यशोधक चळवळ: काल आणि आज

सत्यशोधक चळवळ: काल आणि आज

प्रदीप गणपतराव शेंडे

संशोधक विद्यार्थी

समाजशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,

नागपूर विद्यापीठ, नागपूर

Email Id. pradeepnilsuman@gmail.com,

Mob No. 9422541945

सारांश :

महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधक चळवळीच्या कार्याला गती मिळाली. तत्कालीन परिस्थितीत पेशवाईनंतर स्त्री-शुद्रातिशुद्र यांची परिस्थिती फारच बिकट व नैसर्गिक हक्क व अधिकार नाकारणारी होती. याचे चटके स्वत: जोतीबांनी भोगले. शालेय जीवनात उच्चवर्णीय मित्राच्या निमंत्रणावरून त्याच्या लग्नात ते सहभागी झाले असता त्यांचा अपमान करण्यात आला. त्याची सल त्यांच्या बालमनाला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच त्यांनी धर्मावर आधारीत विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारला मानवताविरोधी चातुर्वर्ण्यव्यवस्था व जातव्यवस्था यासाठी कारणीभूत असल्याची त्यांची खात्री पटली. केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यातून वा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक गुलामगिरीतून स्त्री शुद्रातिशुद्राची सुटका होणार नाही, तर शिक्षणप्रसारातून त्यांना त्यांच्या हक्काचे भान देण्यातून ते साध्य होवू शकेल हे त्यांनी ओळखले. त्यातून सन १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यानंतर अस्पृश्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, साहित्याद्वारे बहुजनांना गुलामगिरीची जाणीव करून देण्यासाठी १८७३ मध्ये गुलामगिरी, शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करण्यासाठी १८८३ मध्ये शेतकऱ्यांचा असूड यासह विविध ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. तसेच सत्सार मधून ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ या शीर्षकाखाली पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे यांची बदनामी करणाऱ्या टीकांकारांना चोख प्रत्युत्तर, सत्यशोधक समाजाची १८७३ ला स्थापना करून ‘धर्म मानवा भेद नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी’ हा सत्यावर आधारित सद्विचार त्यांनी मांडला. पुढे १८९१ मध्ये सार्वजनिक सत्यधर्म स्थापना करून ‘सर्व साक्षी जगत्पती तेथे नकोच मध्यस्थी’ अशी रोखठोक भूमिका घेवून ‘निर्मिक’ ही संकल्पना मांडली व नवा पर्याय दिला. त्याबरोबरच सत्यशोधक चळवळीने स्त्री-दास्य, कामगार यांचे शोषणाविरुद्व लढा उभारतानाच उद्योग या क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्याचेच प्रतीबिंब भारतीय संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्वाद्वारे उमटल्याचे आपणास दिसून येते.

बीज शब्द : सत्यशोधक व्याख्या, कार्य, सत्यधर्म, सहकारी, स्त्री प्रगती, महिलांचे योगदान, आधुनिक चळवळी, विचार, ज्ञानपंरपरा, प्रासंगितता इ.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P051

Download