भारतीय ज्ञान आणि समकालीन समाजः बदलती परिस्थिती, समस्या आणि उपाय

भारतीय ज्ञान आणि समकालीन समाजः बदलती परिस्थिती, समस्या आणि उपाय

संशोध

श्री. गणेश दौलत भोये

रा. तु. म. नागपूर विद्यापीठ नागपूर.

सारांश (Abstract)

भारतीय ज्ञानपरंपरा ही भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक जीवनाचा कणा मानली जाते. वेद, उपनिषद, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, योग, आयुर्वेद आणि लोकज्ञान यांद्वारे भारतीय ज्ञानाने मानवाला समतोल, मूल्याधिष्ठित आणि सुसंवादी जीवन जगण्याची दिशा दिली आहे. मात्र समकालीन समाजात जागतिकीकरण, आधुनिकीकरण, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे समाजाच्या रचनेत मोठे बदल घडून आले आहेत. या बदलत्या परिस्थितीचा थेट परिणाम कुटुंबव्यवस्था, शिक्षणपद्धती, सामाजिक नातेसंबंध आणि मूल्यव्यवस्थेवर झालेला दिसून येतो. आजचा समाज अधिक भौतिकवादी, स्पर्धात्मक आणि व्यक्तिकेंद्री बनत चालला आहे. परिणामी नैतिक मूल्यांचा ऱ्हास, सांस्कृतिक ओळखीचे संकट, मानसिक ताणतणाव, एकाकीपणा, सामाजिक असमानता आणि अस्थिरता यांसारख्या समस्या तीव्र होत आहेत. शिक्षण व्यवस्था प्रामुख्याने रोजगाराभिमुख बनली असून संस्कार, मूल्यशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञान आणि समकालीन समाज यांच्यातील संबंधाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक ठरते.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P026

Download