भारतीय ज्ञान परंपरा आणि नाभिक समाज
-सौ. अर्चना किशोर येऊलकर
सारांश :
प्राचीन काळापासून आपला देश उच्च मानवी मुल्य आणि परंपरा जोपासनारा देश आहे. भारताला ज्ञानाची समृद्ध परंपरा आहे. आज ती शोधण्याची आणि पुनर्संचयित करण्याची गरज आहे. त्या करिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणालीवर भर देण्यात आला आहे. भारतीय ज्ञान परंपरा ही अत्यंत समृद्ध अशी आहे. ज्ञान आणि विज्ञान, लौकिक आणि पारलौकिक कर्म, धर्म तसेच भोग आणि त्याग यांचा अद्भूत समन्वय भारतीय ज्ञान पंरपरेमध्ये आहे. भारतीय ज्ञान परंपरा आजच्या काळातील आव्हानांसाठी मार्गदर्शक आहे. याच आधारावर गावगाड्यातील नाभिक समाजाचा अभ्यास केला आहे. नाभिक समाजाची पूर्वीची स्थिती आणि आजचे बदलले स्वरूप स्पष्ट केलेले आहे. आज नाभिक समाजातील लोकांच्या दृष्टीकोनात बदल झालेला दिसतो. भारतीय ज्ञान परंपरा आणि नाभिक समाजाची परंपरा यांचा समन्वय साधून नाभिक समाजातील व्यक्ती या ज्ञानाचा उपयोग करून नाभिक समाज परिवर्तनाच्या वाटचालीवर आहे.
बिजशब्द : भारतीय ज्ञान परंपरा, नाभिक समाज व बदलती परिस्थिती
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P017
Download