भारतीय शिक्षणप्रणाली व कोविड -१९ वर झालेला परिणाम
शोधार्थी : प्रा.अमिता कृ.महातळे (CHB). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
प्रस्तावना
करोना महामारीमुळे जगातील संपूर्ण लोकांचे जीवन काही काळासाठी थांबले होते. या विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता शासनाकडून ‘सोशल डिस्टन्स’ या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देण्यात आला होता. तात्काळ ताळेबंदी झाल्याने त्याचा गंभीर परिणाम लोकांच्या सामाजिक, आर्थिक तसेच आरोग्य विषयक बाबीवर झालेला होता. या निर्णयाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झालेला दिसून येते. लोकांच्या दिनचर्यमध्ये अचानक बदल झाला होता. विद्यार्थ्यांचे शाळा, कॉलेज बंद झाले. लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर, कामधंद्यावर, व्यवसाय, नोकरीवर देखील विपरीत परिणाम पडला होता. अशा परिस्थितीत लोक स्वतःच्या घरातच बंदिस्त झाली होते. हा काळ अनिश्चिततेचा होता. तसेच अशा भीतीयुक्त, धोकादायक आयुष्याचा अनुभव याआधी लोकांनी कधीच अनुभवला नव्हता. प्रत्येक नवीन उगविणारा दिवस हा नवा प्रश्न, अडचणी घेऊन यायचा. आज काय होणार ?,आज घराबाहेर पडायचे की नाही ?, नोकरी टिकेल की नाही ?, यांसारख्या अनेक अडचणी समोर येत होत्या अशा विचलित करणाऱ्या वातावरणात अनेक लोक अंधश्रद्धा, गैरसमजुती, अफवा यावर विश्वास ठेवू लागले होते. कोविड काळात चुकीची माहिती, अफवा, अंधश्रद्धा पसरू नये याकरिता भारतीय शास्त्रज्ञांचा प्रतिसाद (ASRC) या संस्थेच्या “होअक्स बस्टर्स” (Hoax buster) आणि डॉ. अनामिका रे मेमोरियल ट्रस्ट (ARMT) यांच्या “इन्फोडेमिक विरुद्ध पॅडेंमिक” या दोन जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या. अशा प्रकारचे उपक्रम लोकांमध्ये योग्य माहिती पुरविण्याकरिता उपयोगी ठरतात.( Ankuran Datta). शास्त्रज्ञ, डॉक्टर तसेच माध्यमांनी योग्य ती माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक अफवा तसेच अंधश्रद्धा ,गैरसमजुती याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच योग्य माहिती पुरविली जात होती. भारत सरकारने जनतेने सुरक्षित रहावे याकरिता मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे यासारख्या सवयींचे जनतेने अंगीकार करावा याकरिता जनजागृती केली होती. सरकारकडून वेळोवेळी आवश्यक ती माहिती, मार्गदर्शक तत्वे आणि मदत मिळत होती या सर्व कारणांमुळे लोक सुरक्षित राहिले होते. परंतु दुर्दैवाने या महामारीच्या काळात ‘खोट्या बातम्या’, ‘माहिती’, व ‘अफवांचा महापूर’ आला होता. सोशल मीडिया माध्यमाद्वारे चुकीची माहिती देणारे, अंधश्रद्धा व गैरसमजुतीच्या प्रचार व प्रसार करणाऱ्या अनेक बातम्याचा महापूर आला होता. भारताच्या सामाजिक संरचनेमध्ये पूर्वीपासून अंधश्रद्धा गैरसमजुती याचे वर्चस्व असल्याचे अध्ययनात येते. उदाहरणार्थ वाईट नजरेपासून वाचविण्याकरिता घराला, गाडीला, दुकानाला लिंबू -मिरची लटकविणे, राक्षसाचा चेहरा लावणे, काळ्या रंगाची बाहुली लटकवणे, मांजर आडवे गेल्यास मागे फिरणे तसेच १३ अंकाला अशुभ मानणे यासारखे अनेक गैरसमज आजही अनुभवयास मिळते. या आणि अशा समजुती व गैर समजुती भारतीय परंपरांशी जोडल्या असून त्या सामान्यजणांच्या ज्ञानाचे(अंधश्रद्धा) स्त्रोत आहे.
शब्दकुंजी कोविड-१९, अफवा, अंधश्रद्धा, सोशल मीडिया, ताळेबंदी. परंपरा, विश्वास, ज्ञान.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P009
Download