लोकसभा निवडणूक निकाल २०२४ चा अन्वयार्थ
डॉ. अरविंद सोमनाथे
(सहाय्यक प्राध्यापक)
रा. सू. बिडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
हिंगणघाट. जि. वर्धा
मतदारांचा कौल पूर्णतः भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्या बाजूने नसून तो एनडीएच्या बाजूने आणि विरोधी पक्षांचे अस्तित्व अधोरेखित करणारा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर भर देऊन पंतप्रधान कार्यालयाचे वर्चस्व प्रस्थापित करून विकेंद्रीकरणाची व्यवस्था मोडीत काढली होती. त्यास आता आळा बसेल अशी आशा आहे. भाजपला मित्र पक्षांची आवश्यकता असल्याने शिवाय प्रादेशिक पक्षांच्या जागा वाढल्याने संघराज्य चौकटीतील केंद्र-राज्य संबंधांना नवे संदर्भ प्राप्त होऊ शकतात. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे पक्ष जातकेंद्रित, विकासवादी आणि मध्यममार्गी असल्याने आक्रमक अन्य द्वेषी राजकारणास भाजपाला मुरड घालावी लागणार आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2510I10VXIIIP0004
Download