सातासमुद्रापलीकडे मराठी भाषेचा प्रसार व साहित्य निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता
डॉ. गणपत हराळे,
सहयोगी प्राध्यापक (मराठी)
गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली
ई-मेल-ganpatharale81@gmail.com
भ्रमणध्वनी क्रं- 8788614545
प्रास्ताविक–
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ह्या शब्दाचा वापर गेल्या काही वर्षापासून अधिकाधिक मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात केला जाऊ लागलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने मराठी भाषेच्या क्षेत्रात ही शिरकाव केलेला आहे. मराठी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेल्या या शिरकावाला आता कोणीही अटकाव करू शकणार नाही. किंबहुना सध्या मराठी भाषा (मराठी साहित्य) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील नातेसंबंध आता अधिकाधिक दृढ होऊ लागलेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी साहित्यक्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल झालेले आपणांस दिसून येणार आहेत. परंतु सध्या मराठी साहित्याच्या क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश हा अत्यंत प्रारंभिक व बाल्यावस्थेच्या स्वरूपातील आहे. मानवी बुद्धिमत्तेला आणि सर्जनशीलतेला अर्थात नवनिर्मितीला कृत्रिम बुद्धिमत्ता ही कदापि वरचढ ठरू शकेल असे वाटत नाही.जगातील सर्वाधिक बुद्धिमान प्राणी असलेल्या मनुष्याच्या प्रतिभेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कोणतेही तंत्रज्ञान हे वरचढ ठरू शकत नाही. मानवी बुद्धिमत्तामानवी कल्पकतेला व निर्मितीशीलतेला कृत्रिम बुद्धिमत्ता ही पूरक व पोषक ठरेल, याबाबत तीळमात्र संदेह माझ्या मनात नाही.मानवी प्रतिभेला कृत्रिम बुद्धिमत्तारूपी परिसस्पर्शाचासहवास लाभल्यास साहित्यिकांना सर्वोत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण साहित्यानिर्मिती करण्यास खूप मदत होणार आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व बदल होणार आहेत.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषा आणि मराठी साहित्य जगताला एक वेगळे आयाम प्राप्त होईल. मराठी भाषा आणि मराठी साहित्याचे श्रेष्ठत्व व थोरवी जागतिक पटलावर पोहोचण्यास मौलिक मदत होणार आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0057
Download