शेतीतील जमीन व पाणी व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ते ची भूमिका
श्वेता विशाल देवके
ई-मेल shwetavarale1987@gmail.com
फोन नंबर – 7248971141
एस.एन.डी.टी.महिला विदयापीठ, पुणे.
संशोधक विद्यार्थिनी, भूगोल विभाग
गोषवारा:
भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. भारतीय शेती पारंपारिक पद्धतीवर आधारित असून नैसर्गिक घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. शेती हा नेहमीच मानवी संस्कृतीचा पाया राहिला आहे. परंतु हवामान बदल जलस्तोत्रांची कमतरता जमिनीची ऱ्हास, पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत जमिनीचा वापर वाढत्या प्रमाणात महत्त्वाचा होत आहे. पीक उत्पादनात जमीन आणि पाणी या दोन घटकांना अतिशय महत्त्व आहे. पीक हे जमिनीत वाढत असल्याने पीक वाढीचे जमीन हे मूलभूत माध्यम आहे. जमिनीतील पाणी व त्यात विरघळलेली अन्नद्रव्य शोषण करून विकास पुरवतात त्यामुळे पीक जोमाने वाढते व त्यापासून अधिक उत्पादन मिळते. पारपरिक पद्धतीत पाण्याचा अतिवापर रोपांच्या मुळापर्यंत पाणी न पोहोचणे या समस्या शेतीचे मोठे नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर आर्टिफिशियल इंटिलिजन्स (ए.आय) तंत्रज्ञान शेतीसाठी परिवर्तन कारी ठरत आहे. अलीकडील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जमिनीतील आद्रता मोजणी सिंचन व्यवस्थापन पिकानुसार पाणी वापर, अंदाज, भूमी उपयोग पद्धत, पर्जन्य मानाचा डेटा विश्लेषण व स्मार्ट सिंचन प्रणाली विकसित करण्यात आलेले आहेत. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांना पाण्याची बचत उत्पादन वाढ आणि खर्चात घट दिसून येईल.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0032
Download