राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना :एक अध्ययन
प्रा. डॉ. विशाल चक्रधर गजभिये
सहाय्यक प्राध्यापक
समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, अमरावती
Mob.9850689268
Abstract:
मानवी जीवनाशी संबंधित तसेच राष्ट्र प्रगती संबंधी जे मोजमाप करण्यासाठी जे काही निकष वापरले जातात त्यामध्ये ‘आरोग्य’ हा एक महत्वपूर्ण निकष मानला जातो. भारत देश हा एखाद्या खंडासारखा मोठा देश आहे. ३२ कोटी चौरस किलोमिटर क्षेत्रफळाची भूमी असलेल्या आपल्या देशात जंगले, डोंगर दऱ्या, कडे, कपारीही भरपूर आहेत. समाजाच्या आरोग्याचा विचार करताना हा समाज कुठे आहे याचा विचार करावा लागतो. डोंगर, शिखरावर, दऱ्यामध्ये, जंगलामध्ये, शहरे, लहान मोठी खेडी, वाड्या-वस्त्यामध्ये आपला समाज विखुरलेला आहे. त्यातील बहुतांश लोक पारंपरिक जीवन पध्दतीने राहतात. अज्ञानामुळे तसेच आधुनिक काळात बदलत्या जीवनपध्दतीमुळे त्यांच्या आरोग्य समस्यांची जाणीवच नाही. त्यामुळे त्यावर काही उपाय केला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात येण्याचेही कारण नसते. दूर दूर अंतरावर असलेली वस्ती, तेथील लोकांचा अशिक्षितपणा, अज्ञान, मर्यादित उत्पन्न अशा सगळ्या परिस्थितीमुळे ‘सर्वांना आरोग्य’ देणे ही किती अवघड गोष्ट आहे हे लक्षात येते. भारत सरकारने या सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून विशेष आरोग्य विषयक धोरण राबविण्यास सुरुवात केली. नंतर वेळोवेळी ज्या गंभीर आरोग्य समस्या लक्षात येतात त्या प्रत्येक समस्येचे निमूर्लन किंवा नियंत्रण करण्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाते. या आरोग्य विषयक समस्येला लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने २ जुलै २०१२ पासून महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात केली. मुळातच ही योजना ज्या लोकांचे उत्पन्न दिड लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. आजच्या आधुनिक काळात आणि महागाईच्या काळात सर्वसामान्यांना महागड्या शस्त्रक्रिया, उपचार घेणे शक्य होत नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. हे टाळण्याकरिता ही योजना तयार केली आहे.
Keywords : बी.पी.एल. – दारिद्र्यरेषेखालील, मोफत -विनामूल्य
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2507S01V13P014
Download