राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाज उन्नतीसाठी ज्ञानसाधना
डॉ. भारती कृ. सातपैसे
गो. वा. महाविद्यालय नागभीड,
ता. नागभीड जि. चंद्रपूर
E-mail– bharatisatpaise123@gmail.com
Mo. No. 7972288913
सारांश–
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांचे जीवनचरित्र पाहता असे जाणवते की, त्यांनी ईश्वरप्राप्तीची प्रखर साधना करून समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लहानपणी त्यांना श्री आडकुजी महाराज यांच्या कृपादृष्टीने त्यांच्या जीवनाला एक निश्चित दिशा मिळाली. अशिक्षित व दरिद्री समाजाचे प्रबोधन करुण वास्तविकतेच्या जीवनाचा स्वीकार करून तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांना इंग्रजाविरुद्ध पेटून उठायला भजन आणि खंजिरीच्या माध्यमातून शिकविले. वास्तविक जीवनचा आरसा समाजासमोर उभा केला. ग्रामीण भागात चैतन्य निर्माण केले. लोकांमध्ये, लोकांच्या स्वत:मधल्या असामान्य बुद्धिमत्तेचे दर्शन त्यांना घडविले. गावांना अंतर्बाह्य जागृत केले. अशिक्षित, अज्ञनी समाजासमोर ज्ञानाची कवाडे उघडी केली. महाराजांनी ‘ग्रामगीतेत’ धर्माचा एकांगी विचार केलेला नाही तर एकात्मतेने व समानतेने विचार केला आहे. महाराजाची ग्रामगीता ही लोकशिक्षणाचे विद्यापीठ आहे.
बीज शब्द- चिंतनशिलता, आध्यात्म, वास्तवदर्शी, चैतन्यमय, मानवतावाद, समाजप्रबोधन
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2505S01V13P003
Download