महिला सशक्तीकरण

महिला सक्तीकरण

डॉ. बळीराम राऊत (मराठी विभाग)

सहयोगी प्राध्यापक, जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय, उमरेड

जि. नागपूर & Pin No- 4412103

Mob – 9767278720/9356229389

Email – baliramraut37@gmail.com

सारां 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र होऊन 78 वर्श पुर्ण झाली. या सात दशकाच्या काळात देशाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक व शैक्षणिक प्रगती बऱ्याच प्रमाणात झाली. अगदी प्राचीन काळापासून पुरूष प्रधान संस्कृतीत परंपरा व रूढीच्या जखळात असलेली स्त्री आत्मनिर्भय होऊ शकली नाही. भारतात लोकसंख्येच्या 50टक्के प्रमाणात महिला असून त्यांचे कल्याण झाले नाही. त्यांच्यावरील अन्याय अत्याचार विषयक कठोर धोरण व कायदे करून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने पाहुले उचलली. त्याचेच जोतक म्हणून ‘चूल-मूल’ दृश्टचक्राच्या बाहेर पडून स्त्री शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रात आपल्या महत्वाकांक्षी अश्टपैलूत्वामुळे आपला ठसा उमटवत आहे. अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित होऊन पुरुषाबरोबर आपली कर्तव्य पार पाडतांना स्त्रिया दिसत आहेत हे महिला सबलीकरणाची नांदीच म्हणावी लागेल.

मुख्यशब्दः- महिला, शिक्षण, कायदे, धोरण, विकास, सशक्तीकरण

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I01S01V13P0015

Download