संत चोखामेळा यांच्या अभंगातील गुरु महात्म्य

संत चोखामेळा यांच्या अभंगातील गुरु महात्म्य

प्रा. पुरुषोत्तम एस. निर्मळ

श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालय,

बोरगाव मंजू, जि. अकोला 444 102

मोबाईल 99 211 32 764

ई-मेल – psnirmal2608@gmail.com

सारांश

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक प्रमुख संप्रदाय असून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या संप्रदायाने केले. संत ज्ञानेश्वर, संत  नामदेव यांच्या समकालीन असणाऱ्या संत चोखोबांना आपल्या जीवनात अपमान, अन्याय, मनस्ताप सहन करावा लागला. तरीही त्यांनी विपरीत परिस्थितीतही आपली स्थितप्रज्ञता ढळू न देता अनेक कठीण  प्रसंगांना ते धैर्याने सामोरे गेले. संत नामदेवांच्या  प्रभावळीतील मानवधर्माचा पुरस्कार करणारा महान संत म्हणून संत चोखामेळा यांचे नाव घेतले जाते. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीसोबतच गुरु महात्म्यही त्यांच्या अभंगामधून स्पष्ट होते. अशा या सेवाभावी, पवित्र आणि स्वच्छ मनाच्या चोखोबांसारख्या संतांच्या अभंगातील विचार हे कालातीत वाटतात.

बीज शब्द

गुरु भक्ती, वारकरी संप्रदाय, अभंग, विठ्ठल

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0015

Download