सवित्रीबाई फुले यांचा जीवनपरीचय : एक संशोधन लेख

सवित्रीबाई फुले यांचा जीवनपरीचय : एक संशोधन लेख

संशोधक – प्रा.प्रिया माणिकराव नेहर

सहसंशोधक – डॉ.संदीप रामभाउ निंभोरकर

पी.आर.पाटील शिक्षण महाविद्यालय तळेगाव (शा.पं.) ता.आष्टी, जि.वर्धा, महाराष्ट्र

priyamnehar@gmail.com., sandeeprnimbhorkar1975@gmail.com

9689834861,9373038866

सारांश

शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे आणि जो ते घेणार तो गुरगुरणार. या आंबेडकराच्या विचारांवर सर्व शिक्षण पध्दती व शिक्षणाचे नवनवीन आयाम उभे राहू पाहत आहे. याच विचाराशी जुडलेले महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार ‘विदयेविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविणा गती गेली, गतीविणा वित गेले,वित्तविणा शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.या सार्थ विचारावर कृती करत महात्मा ज्योतीबा फृले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना षिक्षीत केले.या प्रस्तुत लेखात सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर, जिवनावर त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या क्रांतीवर परीचय करत त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरुण त्यांच्या कार्याची प्रचिती कष्ट त्यांनी स्त्री षिक्षणासाठी निर्माण केलेला पायंडा हा स्त्रीयांच्या जिवनातील मैलाचा दगड ठरला. या लेखात त्यांनी केलेले समाजकार्य, शिक्षणकार्य यावर प्रकाशज्योत टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आजही त्यांच्यासारखे प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळवणा-या स्त्रियांना समाजात मानाच्या स्थानासाठी झगडावे लागते.पण सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या खुल्या केलेल्या दालनामुळे आज स्त्री तग धरु पाहत आहे. किंबहुना उंच आकाशात झेप घेत आहे. या लेखात सावित्रीबाई फुले यांची जिवनविषयक गाथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मुख्य शब्द: सावित्रीबाई फुले यांचे बालपण,शिक्षण कार्य, समाजकार्य,स्त्रि शिक्षणात भूमिका, ग्रंथसंपदा

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0012

Download