स्मृतिस्थळातील आचार्य श्री केशिराजव्यास

स्मृतिस्थळातील आचार्य श्री केशिराजव्यास

अश्विनी चंद्रकांत ढोरे

M. A. Net Jrf

प्रस्तावना: 

महानुभाव साहित्य इतिहासात लीळाचरित्रानंतर स्मृतिस्थळा चे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महानुभाव पंथात श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरुढी व वर्तमान अशी एक परंपरा आहे. स्मृती म्हणजे नागदेवाचार्यांनी निश्चित केलेला कृतिरूप आचारधर्म. स्मृतीस्थळात एकूण २६१ स्मृती आहेत . श्री नागदेवाचार्यांच्या सहवासात असलेल्या कितीतरी व्यक्तींचे व्यक्तीचित्रे अत्यंत मोजक्या वर्णनात शब्दांकित झालेली आहेत . म्हणुनच स्मृतीस्थळाविषयी “बिनीच्या महानुभाव ग्रंथकाराची माहिती देणारा प्राचीनतम ग्रंथ हाच होय”. असेजे बा वा. देशपांडे यांनी म्हटले ते अगदी सार्थ होय.

महानुभावांचा विचार पाहावयाचा असेल तर लीळाचरित्राकडे जावे लागते आणि महानुभावांचा उत्तुंग आदर्श पहायचा असेल तर स्मृतिस्थळा कडे यावे लागते. स्मृति स्थळ हा दुसरा प्रमाणग्रंथ आहे. कारण नागदेवाची वाणी ही देववाणी आहे. स्मृतिस्थळांचे लेखन परशराम व्यास आणि नरेंद्र बास यांनी केले. महानुभाव पंथात वा. ना. देशपांडे व रमेश आवलगावकर व शं.गो.तुळपुळें यांनी स्मृतिस्थळ ग्रंथांचे साक्षेपी संपादन केलेले आहे. 

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IVVXIIP0010

Download