शिवकालीन महाराष्ट्राची सामाजिक रचना

शिवकालीन महाराष्ट्राची सामाजिक रचना
 
अमितकुमार गणेश शिंगणे
संशोधक विद्यार्थी
एम. इ. एस. कॉलेज मेहकर,
जिल्हा बुलढाणा.
मो. नं. 99222 38998
सारांश –
मध्ययुगीन कालखंडाच्या अखेरच्या काळात महाराष्ट्रात राजकीय स्वरूपाची क्रांती झाली. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रात म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनावर झाला. याला महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना, भक्ति परंपरेचा, समन्वयवादी धोरणाचा विचार, महाराष्ट्राची स्वतंत्र विचारसरणी इत्यादी घटकांपासून ते महाराष्ट्र धर्मापर्यंत सर्वच घटना परिणामकारक ठरल्या. त्यामुळे महाराष्ट्राची नवी सामाजिक संस्कृती साकार होऊ शकली. शिवाजी महाराजांनी याच काळात महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून भारताला ‘स्वराज्याचा’ पहिला धडा दिला. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आकाराने खूप लहान असले तरीही ते संपूर्ण भारतामधील स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचे प्रयत्न केले. म्हणून महाराष्ट्रातील अठरा पगड जातींच्या लोकांना ‘हिंदवी स्वराज्य’ हे आपलेच स्वतःचे स्वराज्य वाटले. शिवकाळात स्वराज्यामध्ये अनेक जाती व पोटजाती असून त्यांच्यात कधी – कधी संघर्ष उद्भवला नाही. काही प्रकरणे सरकार दरबारी जात असत व चौकशी अंती निवाडा दिला जात असे. परंतु जातियतेवरून निवाडे न देता योग्य पडताळणी करून निवडा व्हायचा. स्वराज्यामध्ये जातीपेक्षा व्यक्तीला, त्यांच्या कार्याला महत्त्व दिले होते. हिंदवी स्वराज्याच्या जडण-घडणीसाठी बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे होते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये हिंदवी स्वराज्यात कधीही धार्मिक दंगल अथवा धार्मिक बंडखोरी न होता धार्मिक आणि सामाजिक सलोखा निर्माण झाला याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन महाराष्ट्राची सामाजिक रचना.
 
बिजशब्द – जात , सलोखा, भटक्या जाती, अस्पृश्य जाती आणि महारवडा

Download