भारतीय ज्ञान आणि सामाजिक परिवर्तना करिता पाली भाषेचे महत्व समस्या व उपाय
संशोधिका
वीणा वसंतराव मानवटकर
मो.नं. 9657398851
ईमेल:: piyumanwatkar@gmail.com
प्रा. डॉ. रीना बावनकुळे
सहाय्यक प्राध्यापक (तत्वज्ञान विभाग)
वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपुर.
सारांश-
भारत देश हजारो वर्षांपासून बहुभाषिक देश होता. कुणा एका भाषेचे महत्व या देशात प्राचीन काळापासून नव्हते विविधतेने नटलेल्या देशात अनेक भाषिक लोक राहत असत. ज्यांची-त्यांची भाषा वेगवेगळी होती. येथे भाषा सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक काळानुसार बदलत गेली. संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, मागधी, अर्धमागधी, पैशाची अनेक भाषा भारतात प्राचीन काळापासून होत्या. भारतीय परंपरा भाषांची अतुट सहसंबन्ध आहे. त्याच प्रमाणे पाली भाषेचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. पाली भाषा जनसामान्यांची भाषा होती. तथागत गौतम बुद्धानी पाली भाषेत आपले उपदेश दिले. त्यांनी लोकाभिमुख असे पाली भाषेचे स्वरूप सामान्य माणसापर्यंत पोहचविले. संस्कृत भाषा पंडित ब्राह्मणांची होती. वेद, पुराण यज्ञ, ह्या भाषेत लिहिलेले होते. उच्चतम पातळी धारण केलेल्या उच्चवर्णीयांची ही भाषा होती. उलट पाली भाषा सामान्य लोकांची होती. गौतम बुध्दानी बहुजनांच्या हिता, सुखाकरिता पाली भाषेत उपदेश दिले. त्यांनी आपले उपदेश पाली भाषेत दिले. जेव्हा त्यांनी या भाषेची निवड केली तेव्हा त्यांची भाषा पालीच असावी.कारण शिक्षण प्रणाली किंवा भाषेचा तेव्हा विकास झालेला नव्हता. केवल बोलचालीची भाषा होती. त्यांच्या पूर्वजांची भाषा ही पाली असावी. त्यामुळे त्यांनी ह्या भाषेत उपदेश देण्याकरिता निवड केली असावी. जिथे संस्कृत उच्चवर्णीय ब्राह्मणांची भाषा होती, तिथे पाली सामान्य जनतेची भाषा होती. गौतम बुद्धानी समता, स्वातंत्र, बंधुता, सामाजिक न्यायाद्वारे लोकांना उपदेश दिला. त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदु मानव होता. त्यांनी उच-नीचता भावना आपल्या उपदेशात ठेवली नाही. पाली भाषेत तयार केलेले त्रिपिटक, विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्म पिटक आजही भारत देशात नाही तर जगात त्याचे पठण करताना आपण बघत आहोत. एवढी बुद्धतत्वज्ञानाची ओळख जगात आहे. त्रिपिटकात अनेक नीतीमूल्य देणारे ग्रंथ आहेत.धम्मपद, जातक कथा, मिलिंद प्रश्न, विसुद्धीमग्ग थेरीगाथा, अनेक ग्रंथ धार्मिक दृष्ट्या नाहीतर भाषिक दृष्टीकोणातून साहित्याचे प्रचंड भंडार आहेत. नैतिक दृष्टीने, मानवाच्या विकासाच्या दृष्टीने पाली भाषेचे महत्व प्राचीन काळापासून आजतागायत महत्वपूर्ण आहे. दुःखीताचे दुःख नष्ट करून सुखाकडे वाटचाल करणारे पाली साहित्य आहे. संस्कृत साहित्यापेक्षा आजही पाली साहित्याचे वाचक अधिक प्रमाणात आहेत. कारण भारत हा देश बहुजनांचा शोषितांचा आहे. त्यामुळे जनसामान्यांचा आधार पाली भाषा आहे. तर उच्चवर्णीयांची भाषा संस्कृत आहे. पाली शब्दाचा अर्थ पंक्ति ‘ओळ’ असा आहे. ज्यामध्ये बुद्ध उपदेश संकलित आहेत. गौतम बुद्धानी पाली भाषेत उपदेश दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना बुद्धवचन असे म्हटलेले आहे. पहिल्यांदा मागधी असे बोलल्या जात होते. कारण तथागत गौतम बुद्ध मगध देशात उपदेश देत होते. कालांतराने मागधीचे ‘पाली’ असे नाव झाले. आज ‘पाली’ नावाने बुद्धांचे भाषा साहित्य भारतातच नाही तर देश विदेशात गेलेले आहे. पाली भाषा लोकजीवनचे नैतिक साहित्य म्हणून उदयास आलेले आहे. इथे कुठेही भेदभावाची भावना निर्माण होत नाही. बुद्धांची सम्यक दृष्टी, सम्यक आचरण करुणा मैत्री जनमानसाबद्दल प्रेम, जिव्हाळा तसेच समता धिष्टीत समाजनिर्मितीची धरोहर म्हणून हे साहित्य नावारूपास आलेले आहे.
बिज शब्द – पाली भाषा, संस्कृत भाषा, बुद्धघोष, पाठ, पंक्ती, त्रिपिटक, ओळ, अट्ठकथा, अनुटिका, टिकासाहित्य, बुद्धवचन, सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्म पिटक, मागधी भाषा, अनुपिटक साहित्य.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P098
Download