भारतीय ज्ञान आणि बदलत चाललेला समाज: बदलती परिस्थिती, समस्या आणि उपाय
संशोधक विद्यार्थीनी
प्रा. प्रमिला मोहिते (हजारे)
रा.तु.म.नागपूर विद्यापीठ, नागपूर
सारांश
भारतीय ज्ञानप्रणाली (Indian Knowledge System) ही मानवजातीतील सर्वात प्राचीन, बहुआयामी आणि सर्वांगीण ज्ञानसंस्था मानली जाते. वेद, उपनिषद, आयुर्वेद, योग, व्याकरण, नाट्यशास्त्र, गणित, ज्योतिष, कृषिविज्ञान, तत्त्वज्ञान आणि सामाजिक मूल्यव्यवस्था यांचा समन्वय असलेले भारतीय ज्ञान केवळ ऐतिहासिक परंपरा नसून आजच्या आधुनिक समाजरचनेतही महत्त्वपूर्ण योगदान देणारी जीवनपद्धती आहे. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, जागतिकीकरण, सामाजिक माध्यमे, बदलती आर्थिक-सांस्कृतिक मूल्ये या सर्वांच्या प्रभावामुळे समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात असताना भारतीय ज्ञानप्रणालीची भूमिका, आव्हाने आणि गरज यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
या शोधनिबंधात भारतीय ज्ञानप्रणालीचे मूलभूत घटक, बदलत्या सामाजिक परिस्थितीतील त्याचे महत्त्व, निर्माण झालेल्या समस्या, आणि भविष्यातील उपाययोजना या सर्वांचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P055
Download