भारतीय समाजप्रबोधनाचा नजिकच्या भूतकाळातील प्रभावी प्रकार ‘खडीगंमत’

भारतीय समाजप्रबोधनाचा नजिकच्या भूतकाळातील प्रभावी प्रकार खडीगंमत

संशोधनकर्ता

प्रकाश नामदेवराव वाहणे

समाजशास्त्र विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ नागपूर

सारांश :

भारतीय समाजप्रबोधनाची परंपरा प्राचिन काळापासून अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येते. यामध्ये समाजसुधारक, साहित्य, संतपरंपरा लोकसंस्कृतीचे उपासक इ. माध्यमांनी प्रामाणिकपणे समाजप्रबोधनाचे व मनोरंजनाचे कार्य केले आहे. समाजप्रबोधन व मनोरंजनाच्या अंगाने भारतातील लोकनाट्य, लोककला या प्रकारांनी समाजप्रबोधनाचे काम मनापासून पार पाडले आहे.

भारतीय रंजनपर लोकनाट्याचा विचार करतांना लोकरंभूमीचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. भारतीय प्रांतातील रंगभूमी असो वा जागतिक असो, त्या एकाच सांस्कृतिक व्यूहातील रंगभूमी आहेत असे दिसून येते.  विविध सांस्कृतिक परंपरानी नटलेल्या भारतात चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला, वाङ्मयकला, लोककला इत्यादी कला जोपासल्या जातात. म्हणून भारत देश सांस्कृतिक दृष्ट्या अव्वल स्थानी आहे. प्राचिन काळापासून भारतातील गावखेड्यात विविध प्रकारच्या कला अस्तित्वात आल्या. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर मानव मनोरंजनाकडे वळतो. मनोरंजनाची भुक भागविण्यासाठी मानवाने नृत्य-नाट्य व गायनाची प्रथा सुरु केली. यातून भारतातील विविध प्रदेशात वेगवेगळ्या लोककला निर्माण झाल्या.

खडीगंमत या लोकनाट्याला महाराष्ट्रात ‘तमाशा’ असे नामाभिधान आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील रंजननाट्यप्रकार नौटंकी, गुजरात मधील भवाई, ख्याल, मध्यप्रदेशातील लोकप्रिय नाट्यप्रकार ‘माच’ आंध्रातील ‘बुर्राकथा’ व मुखवट्याचे ‘छाऊ’ नृत्य, मद्रासचे लोकप्रिय नाट्य ‘तिरुकुथू’ तर उत्तर प्रदेशातील एक रंजकनाट्यप्रकार ‘नौटंकी’ इत्यादी लोकरंजनपर नाट्ये आहेत. ही सगळी रूपे महाराष्ट्रातील ‘तमाशा’ किंवा ‘खडीगंमत’ च्या मुळ रूपाला (गाभ्याला) कायम ठेऊन आविष्कृत झाली आहेत असे म्हणता येते.

केवळ प्रेक्षकांच्या अभिरूचीप्रमाणे व प्रदेशापरत्वे त्यांची रूपे विकसित झाली पण आकृतिबंध आणि त्याचे स्थूलरूप सर्वत्र सारखेच असतात.

साधारणतः पूर्वविदर्भ, मध्यप्रदेशातील व छत्तीसगड मधील काही परिसरात ‘खडीगंमत’ या लोकनाट्याचा बराच प्रभाव दिसून येतो. विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा इ. जिल्ह्यातील खेडे विभागात या लोकनाट्याची परंपरा मागील काही दशकांपासून आजतागायत प्रकर्षाने दिसून येते. मनोरंजनासोबत जनप्रबोधनाचे कार्य करीत असते. परंतु अलिकडे आधुनिक प्रचार माध्यमांमुळे ही लोककला हळूहळू लोप पावत असल्याचे दिसून येते.

बिजशब्द : समाजप्रबोधन, खडीगंमत, नजिकचा भूतकाळ

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P054

Download