भारतीय ज्ञान परंपरेतील इतिहास, समाज, राज्य, अर्थव्यवस्था आणि संस्कृती

भारतीय ज्ञान परंपरेतील इतिहास, समाज, राज्य, अर्थव्यवस्था आणि संस्कृती

डॉ. मोनाली यशवंत बहादुरे

नूतन आदर्श कला, वाणिज्य आणि श्रीमती म.ह.वेगड विज्ञान महा., उमरेड.

M. No. 9765047945

गोषवारा

हजारो प्रवाहांना पोटाशी घेत एक नदी दुसरीकडून येणाऱ्या नदीच्या गळ्यात पडते आणि दोन्ही नद्या एकत्र होऊन सागराला मिळतात आणि सागरही ‘‘सागरे सर्व तीर्थानि या म्हणीनुसार सर्वांना आपल्यात समावून घेतो. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती विविधतेतून एकता प्रकट करुन आपले सर्वसमावेशक अस्तित्त्व आजतागायत टिकून आहे. भारतीय संस्कृती आधुनिक जगामध्ये एकमेव जिवंत सभ्यता आहे ज्याचा भूतकाळाशी थेट आणि जिवंत संबंध आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा आजही सामान्य लोकांच्या जीवनात टिकून आहे. भारतीय ज्ञानपरंपरा ही अद्वितीय ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे, ज्यामध्ये ज्ञान व विज्ञान, वैश्विक आणि दिव्य, कर्म आणि धर्म तसेच भोग आणि त्याग यांचा अद्भूत समन्वय आहे. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीने जीवनातील नैतिक, भौतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक मूल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय ज्ञानपरंपरेचा इतिहास हा अत्यंत प्राचीन, विस्तृत आणि बहुविध आहे. ज्ञानाचा विकास केवळ बौद्धिक स्तरावर नसून अध्यात्म, समाज, विज्ञान कला, राजकारण, धर्म आणि व्यावहारिक जीवनाशी एकत्रितपणे घडलेला दिसते. समग्रता, सातत्य, विविधता आणि मानवकेंद्री दृष्टिकोन हे मुख्यतः ज्ञानपरंपरेचे वैशिष्ट्ये आहे. भारतीय ज्ञानपरंपरेचा इतिहास हा फक्त ग्रंथपरंपरेपुरता मर्यादित नसून तो जीवनपद्धती, संस्कृती, नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक अनुभव यांच्याशी जोडलेला आहे. भारतीय ज्ञानपरंपरा आणि समाज यांचा संबंध अखंड, सेंद्रिय आणि परस्परपुरक आहे. भारतीय ज्ञान परंपरा ही केवळ ऐतिहासिक गोष्ट नाही तर ती भारतीय समाजाच्या मुलभूत गाभ्यामध्ये रूजलेले ज्ञान आहे. भारतीय ज्ञानपरंपरा समाजाच्या घडणीची मुलभूत शक्ती आहे. तिने भारतीय समाजाला सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि बौद्धिक दृष्ट्या समृद्ध केले. आजच्या वैज्ञानिक युगात या परंपरेतील समग्रता, मूल्यव्यवस्था आणि शाश्वततेच्या संकल्पना समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. भारतीय ज्ञान परंपरेनी राज्यव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करतांना असे सांगते की, एक आदर्श राज्यव्यवस्था कशी असावी याचे संपूर्ण तत्त्वज्ञान दिले. या ज्ञान परंपरेनुसार राज्यव्यवस्था ही केवळ सत्ता नसून, ती धर्म आणि नीती यांवर आधारित कर्तव्य आहे. भारतीय ज्ञान परंपरेने राज्यव्यवस्थेला धर्म, नीती आणि लोककल्याण या त्रिकुटावर उभे केले आहे. ही परंपरा आजही नीतिमान, पारदर्शक आणि लोककल्याणकारी शासन कशाप्रकारे चालवता येते याचे मार्गदर्शन करतांना आढळते.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P044

Download