भारतीय ज्ञान आणि दलित मुक्ती

भारतीय ज्ञान आणि दलित मुक्ती

प्रा. मेघश्याम नामदेव ढाकरे

समाजशास्त्र विभाग प्रमुख

विद्या विकास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

समुद्रपूर, जि. वर्धा.

सारांश :

प्राचीन भारताचा विचार केला असता भारतीय ज्ञान प्रणालीतून केवळ धर्माचाच विचार व्यक्त झालेला नसून सामाजिक मूल्य, धर्म, नैतिकता, वेदांचा अभ्यास, आश्रमव्यवस्था, वर्णव्यवस्था, संस्कार, पुरुषार्थ आणि संस्कृती इत्यादीच्या माध्यमातून तसेच वाणिज्य,व्यापार, शिक्षण, वर्ग व्यवस्था समाजाची रचना तयार करण्यात आली होती आणि व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची घडी बसवण्यात आली होती. भारतीय ज्ञान प्रणाली ही प्राचीन ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध बहुआयामी आणि अनुभवावर आधारलेली परंपरा असून तिने भारतीय समाजाला बौद्धिकता, नैतिकता, संस्कृती यासारखे देण दिली आहे. परंतु समकालीन समाजाचा विचार करता भारतीय ज्ञानाचे अनेकदा वैज्ञानिक पुराव्या विना अपप्रामाणीकपणे गौरवीकरण केले जाते. दंतकथा, मिथक, श्रद्धा,पुराणकथा, इतिहास व विज्ञान म्हणून मांडण्याची प्रवृत्ती दिसते, त्यामुळे केवळ इतिहासाचे विकृतीकरण होत नाही तर विवेकवाद,वैज्ञानिकता, यासारख्या सामाजिक मूल्यांना तडा जाताना दिसते आणि आपल्या ज्ञान परंपरेने दिलेली मूल्ये लोप पावततांना  दिसते.

प्रस्तुत रिसर्च पेपर मध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समीक्षात्मक अभ्यास करता करताना तिच्या दलित, वंचित, उपेक्षित, स्त्री घटकावर झालेला ऐतिहासिक प्रभावाचे दर्शन करण्यात आले आहे. वर्णव्यवस्था, जातव्यवस्था यामुळे झालेले अन्याय आणि विवेक वादाचा आणि मानवता वादाचा विचारांचा उगम यांचा अभ्यास यात झालेला आहे आणि भारतीय ज्ञान प्रणालीची पुनर्रचना आता कशी उपयोगातील याची मांडणी केलेली आहे.

बीजशब्द :भारतीय ज्ञान प्रणाली,समकालीन समाज,वैज्ञानिक दृष्टिकोन,अप्रामाणिक गौरवीकरण,इतिहासाचे विकृतीकरण,विवेकवाद,सामाजिक न्याय,दलित मुक्ती,संविधानिक मूल्ये,परंपरा आणि आधुनिकता,विज्ञानविरोधी समजुती,सामाजिक बहिष्कार,डिजिटल अर्काइव्ह,स्थानिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण,मूल्यधारित अध्यात्म

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P041

Download