कैद्यांच्या सुधारणा संदर्भातील सम्राट अशोकांचे धोरण
श्री लक्ष्मण नबाजी साळवे, संशोधक विद्यार्थी,
समाजशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर
सारांश : प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचा महान राजा सम्राट अशोक याने कैद्यांशी कसे वागावे याबाबत खूप चांगले आणि माणुसकीचे धोरण स्वीकारले होते. कलिंग युद्धानंतर त्यांच्या मध्ये परिवर्तन होऊन त्यांना हिंसा व कठोर शिक्षा चुकीच्या वाटू लागल्या. त्यामुळे त्यांनी शिक्षा देण्यापेक्षा लोकांना सुधारण्यावर जास्तीत जास्त भर दिला. सम्राट अशोकांनी कैद्यांवर कठोर शिक्षा करण्याऐवजी दया, करुणा आणि सुधारणा या नीती मूल्यांवर आधारित कारागृह सुधार व्यवस्था तयार केली. त्यांनी ‘धम्म’ या विचारधारेद्वारे कैद्यांना चांगले वागायला, स्वतःवर नियंत्रण ठेवायला आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनायला शिकवले. सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये कैद्यांना माणूस म्हणून वागवावे, त्यांना अनावश्यक छळ करू नये, तसेच काही वेळा शिक्षा कमी करावी किंवा माफ करावी, असे आदेश दिलेले दिसतात. न्याय देताना प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. म्हणूनच असे म्हणता येते की सम्राट अशोकांचे कैद्यांच्या सुधारण्याचे धोरण हे आजच्या मानवाधिकार आणि सुधारात्मक न्याय या कल्पनांसारखेच होते. त्यामुळे त्यांचे धोरण फक्त इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या काळातही प्रेरणा देणारे आहे.
बीजशब्द : सम्राट अशोक, कैदी सुधारणा, धम्म धोरण, मानवतावादी न्याय, सुधारात्मक न्यायव्यवस्था, कारागृह सुधारणा
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P034
Download