भारतीय ज्ञान प्रणालीचे स्त्रोत, आधार व महत्त्व
सौ. जयश्री अरुण चवरे
संशोधक विद्यार्थी, समाजशास्त्र विभाग,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
सारांश/ गोषवारा:
विश्वातील अनेक देश हे आजही अविकसित, विकसनशील व विकसित असलेले आढळतात. त्यातच भारत हा देश विकसनशील देशांच्या श्रेणीत येतो. भारतीय ज्ञान प्रणाली ही विकसनशील आहे असेच म्हणावे लागेल. भारतीय ज्ञान हे धर्मविद्या, अध्यात्मविद्या, ध्वनीलिपी, आरोग्य, रसायन, कृषी, गणित, खगोल या सर्वच बाबतीत प्राचीन काळी होते. आता आधुनिक तंत्रज्ञान ही त्यात जोडल्या गेले आहे. प्राचीन ज्ञान हे आधी मौखिक व नंतर लिखित स्वरूपात उपलब्ध होते हे पाणिनी यांच्या ‘अष्टाध्यायी’ या ध्वन्यात्मक मांडणीच्या वैज्ञानिक पद्धतीमुळे कळते. भारताचे सध्याचे विकसनशील असलेले रूप हे ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. 22 व्या युगात ज्ञान हे तंत्रज्ञान स्वरूपात उपलब्ध झाले आहे. AI सारख्या तंत्रज्ञानामुळे ज्ञानाचा विस्फोट झाला पण प्रत्येकाच्या बोटावर आज ज्ञान वसलेले आहे.
कीवर्ड्स: धर्मविद्या, श्रेणी, ध्वन्यात्मक, विस्फोट
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P028
Download