आधुनिक शिक्षणात आणि गोंड आदिवासी मुलींचे पारंपरिक ज्ञान: एक समन्वयाचा अभ्यास

आधुनिक शिक्षणात आणि गोंड आदिवासी मुलींचे पारंपरिक ज्ञान: एक समन्वयाचा अभ्यास

संशोधनकर्ती

भारती मोहनराव वाहने

रा.तु.म.ना.विद्यापीठ

सारांश

भारतातील आदिवासी समाजामध्ये गोंड समाज हा एक महत्त्वाचा आणि व्यापक आदिवासी घटक आहे. गोंड समाजातील मुलींचे शिक्षण हे केवळ शैक्षणिक प्रगती पुरते मर्यादित नसून त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक सशक्तीकरणाशी निगडित आहे. आधुनिक शिक्षण प्रणाली हे वैज्ञानिक, तांत्रिक आणि जागतिक ज्ञानावर आधारित असताना गोंड आदिवासी मुलींचे पारंपारिक ज्ञान हे निसर्गाधिष्ठित, अनुभवधारित आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेले आहे. या दोन्ही ज्ञानप्रणालीमध्ये समन्वय साधल्यास गोंड आदिवासी मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू शकते. प्रस्तुत संशोधन पेपरामध्ये आधुनिक शिक्षण आणि गोंड आदिवासी मुलींचे पारंपारिक ज्ञानातील परस्पर संबंध समन्वयाचा शक्यता, आव्हाने आणि उपाययोजना याचा सविस्तर अभ्यास करण्यात आलेला आहे. क्षेत्रीय अभ्यास दुय्यम साहित्य आणि पूर्व संशोधनाच्या आधारे असे दिसून येते की पारंपारिक ज्ञानाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश केल्यास शिक्षण अधिक अर्थपूर्ण, उपयुक्त व सांस्कृतिक दृष्ट्या सुसंगत ठरू शकते.

बीजगणित – आधुनिक शिक्षण, गोंड आदिवासी मुली, शैक्षणिक समन्वय, सशक्तिकरण

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P020

Download