भारतीय ज्ञान परंपरा, संपत्तीचा हक्क आणि स्त्रियांचे सक्षमीकरण
कु.अनिता पुरुषोत्तम गणोरकर संशोधक , पदव्युत्तर समाजशास्त्र विभाग, रा. तू. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर
प्रा.डॉ. धनंजय सोनटक्के समाजशास्त्र विभाग प्रमुख, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय, वर्धा – ४४२००१
प्रस्तावना
भारतीय ज्ञान परंपरा ही प्राचीन काळापासून भारतीय समाजात प्रचलित असलेली शिक्षण प्रणाली आहे. ज्ञान परंपरा ही भारतीय संस्कृतीचा मूलभूत पाया आहे आणि भारतीय समाजात संस्कृती ही केंद्रभिमूक आहे. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे .भारतीय ज्ञान परंपरेत वेद ,वेदांग ,उपनिषद ,श्रुती , स्मृतीपासून ते आयुर्वेद साख्यसिद्धांत ,तत्त्वज्ञान ,धर्मशास्त्र, अर्थशास्त्र ,विज्ञान ,खगोलशास्त्र ,गणित या स्वरूपापर्यंत ज्ञानाचा विशाल संग्रह आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेवर (IKS) भर देऊन विद्यार्थ्यांना भारतीय प्राचीन परंपरा ,संस्कार- संस्कृती, मातृभाषा या सर्व शिक्षण पद्धतीचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे हा यामागचा उद्देश आहे. सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवितांना विद्यार्थ्यांचा सामाजिक सांस्कृतिक विकास घडवून निस्वार्थी,त्यागी ,सर्वज्ञानी विद्यार्थी तयार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. प्राचीन काळी भारतीय शिक्षण व्यवस्थेचे जे स्थान होते ते स्थान परत मिळविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण प्रयत्नशील आहे. भारतीय ज्ञानाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्राचीन काळापासून अतिशय व्यापक आणि सूक्ष्म स्वरूपाचा राहिलेला आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P013
Download