भारतीय ज्ञान परंपरा आणि गावगाड्यातील बलुतेदारी व्यवस्था
आम्रपाली कांबळे
Ph.D Scholar
Department of sociology
RTMNU NAGPUR UNIVERSITY
सारांश
गावगाडा आणि भारतीय ज्ञान परंपरा याचा संबंध गावोगावी टिकून असलेल्या पारंपारिक ज्ञान प्रणाली मध्ये आहे. गावगाडा हे भारतीय ज्ञान परंपरेचे एक महत्त्वाची अंग आहे कारण गावाची रचना आणि जीवन पद्धती ह्या ज्ञानपरंपरेच्या मूल्यावर आधारित आहेत. गावाची पारंपारिक व्यवस्था समजून घेतांना, पूर्वीच्या काळी आपल्या समाजात बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. शेतकरी हा शेती करायचा पण त्याच्या इतर गरजा भागवण्यासाठी आणि वस्तूची देवाण-घेवाण करण्यासाठी एक सिस्टीम काम करायची तिला बोलूतेदारी म्हणत,हे बलुतेदार गावचे वतनदार असत. पिढ्यानपिढ्या तेच गावचे ठराविक काम करत असत. गाव गाड्याच्या ह्याच व्यवस्थेला समजून घेण्याकरिता गावगाडा व त्याची संरचना समजून घेण्याकरिता गावात कधी काळी अस्तित्वात असणारी गावाची पारंपारिक व्यवस्था समजून घेणे तितकीच महत्त्वाची आहे. गावगाडा ही एका बाजूला शेती व्यवस्थेतील उत्पादन प्रक्रिया सांभाळणारी व्यवस्था होती तर दुसऱ्या बाजूला तिला जातीय संबंध व उतरंड सांभाळणाऱ्या व्यवस्थेचे स्वरूप येत गेले .जातीला गावगाड्यात विशिष्ट भूमिका व विशिष्ट कामे होते व ते वंशपरंपरागत होते. जात ही जन्मजात व जाते आधारित व्यवसाय असल्याने व्यवसाय व कामही जन्मजात होते.आपल्या जातीपलीकडे काम करण्याची मुभा नव्हती. हा ढाचा मोठ्या प्रमाणात पिढ्यानेपिढ्या टिकून राहण्याचे कारण त्यांना बांधून ठेवणारे सांस्कृतिक व धार्मिक बंधन होय.गावातल्या देवस्थानाची जोडलेले पारंपरिक मान आणि त्याची धार्मिक व्यवस्था ही त्याचा आधार होती. नुसते व्यवसाय इतका प्रदीर्घ काळ जातीनिहान टिकवणे कठीण होते .आजही व्यवसाय आधारित गावगाडा कोसळला असला तरी अनेक गावात त्याची देवस्थानाची जोडलेली आखणी आणि मानकरांनी व्यवस्था बऱ्यापैकी टिकून आहे. गावगाडा हे चाक होते या चाकाच्या आऱ्या प्रत्येक भाग बांधला होता कोणी सुटले नव्हते. हा लेख महाराष्ट्रात मधील वर्धा जिल्ह्यातील एका गावातील व्यक्तीगत अध्ययन करून प्राथमिक माहिती एकत्रित करत, गाव गाड्यातील संरचना समजून घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमांतून केला.
बीज शब्द: वतनदार, बलुतेदार , सामाजिक व्यवस्था, धार्मिक व्यवस्था, मानपान,वर्ण व्यवस्था,जात व्यवस्था, जातीय उतरंड, बलुत इत्यादी
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P011
Download