धनगर समाजातील स्त्रियांचे बदलते स्थान व उपजीविका
संशोधक
कु. आभा आसाराम सिंगनजुडे
रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर
मार्गदर्शक
डॉ. सुरेंद्र धनसिंग पवार
एम.ए. (समाजशास्त्र), एम.एड., एम.फिल., पीएच.डी., एच.डी.सी.एम., जी.डी.सी.ए. प्राचार्य, एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी, जि. भंडारा
सारांश :
हा अभ्यास धनगर समाजातील स्त्रियांचे बदलते स्थान व उपजीविका यांचा शोध घेतो. धनगर महिला पारंपारिकपणे पशुपालनात सक्रिय असल्या तरी आता त्या शिक्षण स्वयंसहायता गट आणि सरकारी योजनांच्या मदतीने सेंद्रिय शेती, फुल शेती आणि इतर उद्योगांमध्ये स्वतःला सक्षम करीत आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे. या शोधनिबंधाचा उद्देश धनगर समाजातील स्त्रियांची खरी ओळख समजून घेणे हा आहे. तसेच यात स्त्रियांच्या बदलत्या स्थितीचा (स्थान व उपजीविका) शोध घेण्यात आला आहे. या संशोधनात प्राथमिक व दुय्यम डेटा विश्लेषणासाठी वापरला गेला आहे. प्रश्नावली तयार करून प्रत्यक्षरीत्या मुलाखत घेऊन स्त्रियांचे बदलते स्थान व उपजीविका यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच धनगर समाजातील पन्नास (५०) स्त्री प्रतिसादकर्त्यांचा नमुना काढला आहे. या अभ्यासावरून धनगर समाजातील स्त्रियांच्या स्थान व उपजीविकेत बदल झालेला दिसून येत आहे.
बीजशब्द : धनगर, समाज, स्त्रियांचे स्थान, बदलते स्थान, उपजीविका.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P002
Download