निती आयोग :एक धोरणात्मक संस्था
डॉ पिनाटे किरण प्रल्हादराव
लोकप्रशासन विभाग प्रमुख
कै.शेषाबाई सिताराम मुंढे, कला महाविद्यालय गंगाखेड. जि.परभणी 431514.
9604630017
*सारांश:- स्वतंत्र भारताच्या 65 वर्षाच्या इतिहासात 12 पंचवार्षिक योजना देणाऱ्या नियोजन आयोगाची जागा आता नीती आयोगाने घेतली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नियोजन आयोगाचे नामकरण “नीती आयोग” असे केले. निती आयोग हे देशाच्या विकासासाठी एक विचार-मंथन करणारी संस्था आहे. जी केवळ धोरणे ठरवत नाही तर ती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी राज्यांना ही सोबत घेऊन कार्य करते. सहकारी संघराज्य वाद्याला प्रोत्साहन देणे ,धोरणात्मक थिंक टॅंक म्हणून काम करणे, सर्वसमावेशक विकासाला चालना देणे, नव कल्पना आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि धोरणाची अंमलबजावणी व मूल्यमापन करणे ही नीती आयोगाची उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नीती आयोग स्वतःला एक प्रगत संसाधन केंद्र म्हणून सक्रियपणे उभे करत आहे. जे जलद निर्णय घेण्यास ,संशोधन आणि नव उपक्रमाला चालना देण्यासाठी तसेच सरकारसाठी धोरणात्मक धोरण रोड मॅप ऑफर करण्यासाठी आवश्यक कौशल्य स्वतःमध्ये निर्माण करत आहे.
*मुख्य शब्द:- धोरणात्मक संस्था, लोककल्याण ,पारदर्शक ,सहभाग , सहकारी संघराज्य वाद, संशोधन, नव कल्पना, नवोपक्रम, विकास व कल्याण.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2512S01V13P017
Download