विकसीत भारत आणि मानवी विकास निर्देशांक एक अभ्यास (HDI)
प्रा.डॉ.माने डी.एन
कृष्णा महाविद्यालय रेटरे बु|
शिवनगर , ता.कराड, जि.सातारा
विभाग – अर्थशास्त्र
गोषवारा :
देशाचा आर्थिक विकास हा मानवी संसाधनाच्या विकासावर अवलंबून आहे.देशाच्या आर्थिक सामाजिक विकास वेगाने घडवून आणावयाचा असेल तर मावी संसाधनातील गुंतवणूक वाढविली पाहिजे सदर पेपर मध्ये मानवी विकास निर्देशकाला प्राधान्य दिले आहे. देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मानवी संसाधनाचा विकास हा एक महत्वाचा गाभा आहे. मानवी साधन संपत्तीचा विकास म्हणजे लोकांचे शिक्षण आरोग्य, कौशल्ये आणि क्षमता वाढवून त्यांना सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सक्षम करणे होय. इमारती रस्ते, कारखाने यासारख्या भौतिक घटकासोबत तंत्रज्ञान, सामाजिक एकता आणि राजकारण यांचाही विकास साधने समाविष्ट आहे. मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांच्या जीवन मानात सुधारणा होते. देशाची प्रगती होऊन विकास साध्य करणे होय. सदर लेखात विकसित भारत होण्यासाठी लोकांच्या कल्याणावर भर दिला पाहिजे आर्थिक कल्याणासाठी त्यांचे क्षमता व कौशल्य वाढविण्यासाठी आरोग्य व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याच्या प्रयत्नावर या लेखात प्रकाश टाकला आहे मानवी मूल्य व लोकांचा सर्वांगीण विकास यावर संशोधनपर या लेखात प्रकाश टाकला आहे. नविन शोध तंत्रज्ञान आधुनिक माहितीचा व दळणवळणाचा विचार करून शाश्वत साधन संपत्तीचा विकास कसा करता येईल. यावर सदर संशोधनपर लेखात प्रकाश टाकला आहे. वरील अनेक मुद्द्यांमध्ये वाढ झाली तरच मानवी निर्देशांक वाढून विकसीत भारत होण्यास वाटचाल करता येईल.
प्रमुख शब्द (Key Words)- भारत देश विकासाची पाऊले टाकत असतांना मानवी विकास निरदेशांक दरडोई उत्पन्न यात वाढ झाली तर भारताचा विक्कास शक्य आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P022
Download