जाहिरातकलेत रेखाकला आणि संगीत यांचा मानवी भावनांशी संबंध
मनोज वामनराव चोपडे
ललित कला विभाग व छंद मंदिर, रा.तू.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर
मो.नं : ९०२८६११५०६, ई-मेल: manojchopade12@gmail.com
सारांश (Abstract)
या संशोधनात जाहिरातकलेतील रेखाकला आणि संगीत यांचा मानवी भावनांवर होणारा परिणाम अभ्यासला आहे. दृश्यात्मक आणि श्राव्य घटक एकत्र येऊन ग्राहकांच्या मनावर कसा परिणाम घडवतात, हे या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. निवडक भारतीय दूरचित्रवाणी जाहिरातींच्या विश्लेषणातून असे दिसून आले की रेखाकलेतील रंगछटा, रेषांचे स्वरूप, आणि संगीताचे लय-ताल हे घटक प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिसादावर थेट परिणाम करतात. या निष्कर्षांमधून जाहिरातकलेतील कलात्मक घटकांचा मानसशास्त्रीय प्रभाव अधोरेखित होतो. या दोन कलांचा एकत्रित वापर जाहिरातींना जिवंतपणा, स्मरणीयता आणि विश्वासार्हता प्रदान करतो.
कीवर्ड्स(Keywords): जाहिरातकला, रेखाकला, संगीत, भावना, दृश्यसंवाद
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P021
Download