आशा वर्करच्या समस्या आणि समस्यांचा त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक जिवणावर होणाऱ्या परिणामाचे अध्ययन

आशा वर्करच्या समस्या आणि समस्यांचा त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक जिवणावर होणाऱ्या परिणामाचे अध्ययन

प्रा. डॉ. सुनिल व्ही. कोडापे

बी.पी. नॅषनल इन्स्टिटयुट ऑफ सोषल वर्क, हनुमान नगर, नागपूर 24

मो. 9421710827

प्रस्तावना

भारतातील बालकल्याण ही संल्पना प्राचीन असून षिषुगृहाच्या माध्यमातून बालकांचे कल्याण करण्याचा प्रयत्न बालविकास म्हणजे बालकातील भावनिक, बौध्दिक व वर्तन क्षमतेत वाढ करण्यासाठी बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यातून पुढे मानव विकास घडावा म्हणून अंगण परिसरात चालवली जाणारी माहिती केंद्र म्हणजे बालकांना पूर्ण प्राथमिक षिक्षण देणे तसेच माता-बालक हयांच्या आरोग्य आहार, कुपोशण या अन्य बाबीकडे लक्ष पुरविणे अषा कार्याचा समावेष अंगणवाडीमध्ये होतो. हयाषिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्षन करणे अंगणवाडीचे उद्घाटन करून अंगणवाडी ही योजना महाराश्ट्रभर लागू केली. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ हयांनी अंगणवाडी प्रणालीवर अधिक संषोधन केले. भारत सरकारनी 1965 साली समन्वित बाल विकास योजना ¼ICDS)(Integrate Child Development Services) कार्यरत केली. हया योजनेत कुपोशण आणि पुरक आहाराची कमतरता हया सारख्या समस्याचा निर्मुलनावर अधिक भर दिला जातो. अंगणवाडी हा उपक्रम केंद्र व राज्य षासन यांचा संयुक्त उपक्रम आहे. राज्यात एकूण 5 लाख 80 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिस व मिनी अंगणवाडीच्या 20 हजार सेविका आहेत. त्यांचे भविश्य षासनाच्या दुर्लक्षामुळे अंधकारमय होत आहेत. कामाच्या अतिरिक्त बिना अत्यल्प व अवेळी मिळणारे वेतन सुपरवायझरची दादागिरी व आर्थिक छळ यात सेविका भरडल्या जात आहेत. षासनाचे आजपर्यंत पोकळ आष्वासनांना कंटाळून त्यांनी हे आंदोलन पुकारले. षाळेकरी मुलांच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका अंगणवाडी आषा सेविकांदेखील पार पाडतात. मात्र ज्या कार्याच्या अतिरेकी बोजाखाली फार दबून गेल्या आहेत. मानधनही तुटपूंजे आहे. त्यापेक्षा इतर राज्यांतील अंगणवाडी आषा सेविका आणि सेवकांचे चांगले मानधन आहे. मानधन वाढीबाबत नियुक्त केलेल्या समितीने मानधन वाढीची षिफारस केली परंतु षासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P014

Download