शाश्वत विकास काळाची गरज
प्रा. गणेश तुकाराम मोकासरे,
सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव
मो. 9923344975
सारांश:
पर्यावरणीय प्रदुषणाचे प्रमुख कारण म्हणजे मानवाची भौतिक लालसा होय. आज जगामध्ये वाढलेली आर्थिक स्पर्धा होय. सर्वच देश आर्थिक व भौतिकविकासाच्या स्पर्धेत धावत आहे. या चढाओढीत त्यांनी पर्यावरणाकडे पुर्णत: कानाडोळा करुन, त्याची लुट करणे सुरू आहे. जर असेच पर्यावरणची हानी होत राहीली, तर महापूर, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती मोठयाप्रमाणवर उद्धभवतील. वायू व ध्वनी प्रदूषणामुळे अनेक भयंकर आजार निर्माण होतील आणि तो दिवस दूर नसेल ज्यादिवशी या पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी सुपष्टात आलेली असेल. त्यामुळे मानवाने हा विचार करायला हवा आपण निसर्गाचे एक घटक आहोत, निसर्गाची हानी म्हणजे आपलीच हानी होय. त्याशीवाय आपणाला जीवन शक्य नाही. म्हणूनच निसर्ग जपा तो आपल्याला जपेल. विकास हा गरजेचा आहे. परंतु आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून केलेला विकास म्हणजे विकास नाही, तर विकास हा पर्यावरण पूरक असावा जेणे करून त्याची हानी होणार नाही आणि आपल्या भावीपिढीला ही स्वच्छ सुंदर निसर्ग आपण सुपूर्द करू शकतो. थोडक्यात काय तर शाश्वत विकासाशीवाय दुसरा पर्याय नाही.
मुख्य शब्द :(Key Words) शाश्वत विकास, पर्यावरण, शाश्वत विकास ध्येय , प्रदूषण
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P012
Download