चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम जमातीच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम जमातीच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन

संशोधनकर्ता:- अंबादास भगवान तिरनकर

Email ID:-ambadastirankar@gmail.com

मार्गदर्शक डॉ. आशिष कृष्णाजी महातळे

संशोधन केंद्र – जनता महाविद्यालय, चंद्रपूर

सारांश:-

मानवाच्या मूलभूत गरजा जसे की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांच्या पूर्ततेसाठी आर्थिक क्रिया आवश्यक असतात. महाराष्ट्रामध्ये एकुण 45 आदिवासी जमाती असून या 45 जमातींपैकी महाराष्ट्रामध्ये कोलाम, कातकरी व माडीया गोंड या जमातीला केंद्रशासनाकडून आदिम जमातीचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कोलाम ही चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम जमात असून, ती डोंगराळ आणि दुर्गम भागात वास्तव्यास आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीवर परंपरागत शेती, मजुरी आणि वनउपज संकलन यांचा प्रभाव आहे. तसेच शेतीसाठी करण्यात येणारी बि-बियाणांची खरेदी, शेतामधील उत्पादीत मालाची विक्री, शेतीकरिता लागणारे कर्ज कुठून घेतात. त्यांचा कर्जाचा स्त्रोत कोणता आहे व घेतलेल्या कर्जाचे नियमित परतफेड करतात किंवा नाही. या रिसर्च पेपरमध्ये कोलाम जमातीच्या आर्थिक क्रियांचे विश्लेषण, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत, शेतीचे स्वरूप, आणि आर्थिक आव्हानांचा अभ्यास केला आहे.

बीजशब्द:- आदिम जमात, अधिुसुचित, आर्थिक स्थिती, व्यवसाय, उत्पन्नाचा स्त्रोत, कर्जपुरवठा, सिंचनाचा स्त्रोत, परतफेड, शेतीचे प्रमाण इ.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P002

Download