मातीशी बांधलेलं आयुष्य : २१ व्या शतकात शेतकऱ्यांचा संघर्ष

मातीशी बांधलेलं आयुष्य : २१ व्या शतकात शेतकऱ्यांचा संघर्ष

डॉ. अरविंद सोमनाथे

(सहाय्यक प्राध्यापक)

रा. सू. बिडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

हिंगणघाट. जि. वर्धा

arvindsomnathe21@gmail.com

                      भारताला जगात “कृषिप्रधान देश” म्हणून ओळखले जाते. अन्नधान्य, फळे, भाजीपाला, कापूस, ऊस, मसाले – या सगळ्या गोष्टी जगभरात भारतीय शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे पोहोचतात. परंतु या अन्नदात्याचं स्वतःचं पोट मात्र आजही अर्धभुकेलं आहे, हे या देशाचं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकविसाव्या शतकात, जिथे तंत्रज्ञानाने माणसाला चंद्रावर पोहोचवलं आहे, तिथे भारतीय शेतकरी अजूनही पावसाच्या विचलित प्रमाणाने बेजार झालेला  आहे. त्याच्या श्रमाला योग्य किंमत मिळत नाही, त्याच्या अडचणींकडे समाज आणि प्रशासन दोघंही फारसं लक्ष देत नाहीत. या शतकात जग बदललं, पण शेतकऱ्याचं जीवन अजूनही संघर्षाने भरलेलं आहे.शेती हा व्यवसाय नाही, ती एक जीवनपद्धती आहे. पण आज ती जीवनपद्धती अस्थिरतेच्या, अनिश्चिततेच्या आणि उपेक्षेच्या सावलीत हरवत चालली आहे. शेतकरी दिवस-रात्र श्रम करतो, निसर्गाशी झुंजतो, पण शेवटी त्याला मिळतो तो केवळ तोट्याचा हिशोब. त्याच्या श्रमाची किंमत बाजारात ठरवतो तो व्यापारी, आणि हवामान ठरवतो त्याचं भविष्य. पाऊस वेळेवर आला नाही, तर दुष्काळ; आणि जास्त आला तर पूर – दोन्ही परिस्थितींमध्ये त्याचं नुकसानच ठरलेलं असतं. अशा अस्थिर वातावरणात तो जगतो आणि जगवतोही.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2510I10VXIIIP0008

Download