मराठी भाषेसाठी नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): उपयोजन आणि मर्यादा
प्रा.डॉ. सागर अशोक पाटील
कन्या महाविद्यालय,मिरज
भाषा ही मानवी संस्कृतीचा पाया असून संवादाचे सर्वात प्रभावी साधन आहे. डिजिटल युगामध्ये भाषेचे महत्त्व केवळ दैनंदिन संभाषणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ती माहिती तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शिक्षण आणि सामाजिक माध्यमे या सर्व क्षेत्रांत मध्यवर्ती ठरली आहे. संगणकांना मानवी भाषेचा अर्थ समजून घेता यावा आणि ते योग्य प्रतिसाद देऊ शकावेत, यासाठी नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन शाखांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. Jurafsky आणि Martin यांनी Speech and Language Processing (2023, p. 29) या पुस्तकात स्पष्ट केले आहे की NLP म्हणजे संगणक विज्ञान आणि भाषाशास्त्र यांचा संगम आहे. इंग्रजी, चिनी, जपानी अशा भाषांमध्ये NLP विषयक विपुल संशोधन उपलब्ध आहे; मात्र भारतीय भाषांमध्ये हे कार्य मर्यादित आहे. हिंदीत काही साधने तयार झाली असली तरी मराठीमध्ये या संदर्भातील प्रगती अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे.सदर संशोधन पेपरसाठी गुणात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0063
Download