प्राकृत भाषेच्या संवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग: एक बहुविषयक दृष्टीकोन

प्राकृत भाषेच्या संवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग: एक बहुविषयक दृष्टीकोन

प्रा. स्वाती महावीर पाटील

लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय, मिरज

प्रस्तावना:

भारतीय भाषांचा इतिहास अत्यंत प्राचीन व समृद्ध आहे. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि आधुनिक भाषांचा हा प्रवास पाहिला असता प्राकृत भाषेचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित होते. प्राकृत हा शब्द ‘‘प्रकृति‘‘ या मूळ शब्दापासून आला असून त्याचा अर्थ नैसर्गिक, स्वाभाविक असा होतो. म्हणूनच प्राकृत भाषा ही लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील खरीखुरी बोलीभाषा होती, जी विद्वानांच्या संस्कृत भाषेपेक्षा अधिक लोकाभिमुख होती. प्राकृत भाषा ही केवळ लोकभाषा किंवा साहित्यनिर्मितीचे साधन नव्हे, तर भारतीय संस्कृतीची, धर्माची आणि साहित्य परंपरेची सजीव साक्ष आहे. तिने धार्मिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, इतिहासाला शिलालेखांच्या रूपाने आकार दिला आणि भारतीय भाषांच्या विकासाला भक्कम पाया घातला. म्हणूनच प्राकृत भाषेला भारतीय भाषा विकासाच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0060

Download