समाजातील कृत्रिम बुद्धिमत्त्तेचा समाजशास्त्रीय अभ्यास
डॉ. गंगाधर बालू चव्हाण
समजाशस्त्र विभाग प्रमुख
कन्या महाविद्यालय मिरज
मो.नं. ९७६६११५००८
प्रस्तावना (Abstract):
21 व्या शतकात आपण एका अशा युगात प्रवेश केला आहे, जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केवळ सहाय्यक साधनांपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो निर्णयक्षम, विचार करणारा आणि शिकणारा व शिकवणारा बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे असे तंत्रज्ञान आहे जे आजच्या आधुनिक समाजात प्रभाव टाकणारे महत्त्वाचे यंत्र बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशा संगणकीय प्रणालींचा समुच्चय जो मानवी मेंदूप्रमाणे विचार करतो, शिकतो, आणि निर्णय घेतो. उदाहरणार्थ – मोबाईलमधील Google Assistant, ChatGPT, वैद्यकीय निदान करणारी यंत्रणा, शिफारस प्रणाली (Netflix, YouTube), ड्रायव्हरलेस गाड्या इत्यादी. (AI) हे आधुनिक समाजातील एक प्रभावशाली तंत्रज्ञान बनले आहे. समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहता, AI हे केवळ तांत्रिक साधन नसून, ते समाजाच्या संरचना, सामाजिक नाती, मूल्यव्यवस्था, आणि सामाजिक बदलांवर परिणाम करणारे माध्यम आहे. या अभ्यासात, AI चा समाजावर होणारा प्रभाव, सामाजिक विषमता, रोजगार, नैतिकता आणि सामाजिक जाणीव या पैलूंवर अभ्यास केला आहे. AI ही केवळ संगणकीय प्रणाली नसून ती मानवी निर्णयक्षमतेची नक्कल करणारी यंत्रणा आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून, तंत्रज्ञान आणि समाज यांचे संबंध नेहमीच परस्परसंबंधित राहिले आहेत. आज AI मुळे समाजाच्या विविध घटकांमध्ये मोठे बदल होत आहेत – जसे की नोकऱ्यांमध्ये बदल, सामाजिक संवादाची पद्धत, व संस्थात्मक कार्यपद्धती. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) ही आजच्या युगातील सर्वांत झपाट्याने प्रगत होणारी तंत्रज्ञान शाखा आहे. संगणकांची गणनाशक्ती प्रचंड वाढल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर माहिती (Big Data) उपलब्ध झाल्यामुळे AI सतत शिकत आहे. मशीन लर्निंग व डीप लर्निंग या तंत्रांमुळे ती अनुभवातून स्वतः सुधारते आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी – जसे की भाषांतर, चेहरा ओळख, स्वयंचलित गाड्या, औषध संशोधन, रोबोटिक शस्त्रक्रिया – आता सहज शक्य झाल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, दैनंदिन जीवन, बँकिंग आणि मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रात AI चा प्रसार होत आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0047
Download