मराठी साहित्य संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका

मराठी साहित्य संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका

संध्या शशिकांत खिलारे

ईमेल – sandhya.khilare@gmail.com

फोन नंबर – 9403861963

संशोधक विद्यार्थिनी

प्रस्तावना :

साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हटले जाते. समाजातील घडामोडी चळवळी समाजातील बदल याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले जाते. साहित्याचे संशोधन करताना ते विविध पद्धतीने केळे जाते. मराठी साहित्याचे संशोधन करताना समीक्षेतील विविध समीक्षा पद्धतींचा वापर केला जातो जसे की कलावादी समाजशास्त्रीय मानसशास्त्रीय सांस्कृतिक ऐतिहासिक इत्यादि दृष्टीने त्याचा अभ्यास केला जातो. संशोधन करताना पारंपरिक संशोधनांच्या साधनांचा उपयोग केला जात आहे. परंतु आज २१ शतकात सारा समाज सारे जग बदलले आहे. समाजातील सर्वच ठिकाणी आज संगणकाचा वापर केला जात आहे परंतु आज संशोधन असेल किंवा अन्य ठिकाणी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence AI ) आधार घेतला जात आहे. यांच्या आधारे संशोधनात अचूकता येत आहे शिवाय वेळेची बचत होत आहे. आज साहित्याचा अभ्यास किंवा संशोधन ते आंतरविद्याशाखीय पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे अश्या संशोधनात सामाजिक शास्त्रे भारतीय भाषा परकीय भाषा यांचे सखोल ज्ञान सर्वांनाच असते असे नाही. अशावेळी साहित्य संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाऊ शकते.म्हणजेच आजच्या आधुनिक काळात साहित्य संशोधनात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची ठरत आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0045

Download