शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे स्थान

शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे स्थान

विनोदिनी अरुण मिरजकर

फोन नंबर -9665395663

ईमेल -vinodinim9@gmail.com

सारांश

‘ए आय हे भविष्यातील नव्हे तर आजच्या जगात यशस्वी होण्याचं साधन आहे’, संदीप काकडे यांचे हे विधान शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व त्यामुळे होणारी वर्तमानातील प्रगती पहाता आश्चर्यकारक वाटते.  हे विधान मुळातच ही फक्त भविष्याची कल्पना न राहता आजच्या शिक्षण प्रक्रियेत सक्रियपणे समाविष्ट केली पाहिजे. शिक्षक विद्यार्थी व पालक हा त्रिकोण या आधारित साधनांचा वापर करून शिकणे, शिकवणे आणि आत्मविकास करून घेणे सहज शक्य आहे. एकविसाव्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला असताना कृत्रिम बुद्धिमत्ता हे शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी साधन म्हणून आज वर्तमानात उदयास आले आहे. पारंपरिक ज्ञानार्जनाच्या साधनां बरोबरच या आधारित तंत्रज्ञानाचा समन्वय करून अध्यापन, अभ्यास, अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक, आकर्षक व वैयक्तिक करण्याची क्षमता यात आहे. विविध संसाधनांच्या आधारे गुगल जेमिनी, गो किड्स, भाषा शिकण्यासाठी प्रोडीजी, मॅच गेम गणिती खेळातून, गुगल रीड शिकवणारे साधन विकसित करणारे ॲप बोलो, माध्यमिक विभागासाठी खान अकॅडमी विथ ए आय, ट्विटर, चाटजीपीटी, जेमिनी, लाफ्टर वर्चुअल सायन्स लॅब विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शिक्षणात स्वावलंबी आणि सर्जनशील बनण्याची प्रेरणा मिळेल. डेटा आधारित निर्णय शक्ती शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते.

शोध संज्ञा – कृत्रिम बुद्धिमत्ता, अलेक्सा, माहितीचे स्वयंचलन.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0024

Download