मानवी विकासात कृत्रिम बुध्दिमत्तेची उपयुक्तताः काळाची गरज

मानवी विकासात कृत्रिम बुध्दिमत्तेची उपयुक्तताः काळाची गरज

प्रा. डॉ. जयकुमार चंदनशिवे.

कन्या महाविद्यालय, मिरज.

मो. 9860610864

ईमेल- chandanshive.jaykumar@gmail.com

सारांशः-

            कृत्रिम बुध्दिमत्ता (ए. आय.) मानवाच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणारे एक नवतंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. ।प् च्या मदतीने मानवी मेंदूची कार्यक्षमता वाढली असून त्यामुळे नवनवीन क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग केला जात आहे. शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात अचूक निदान करणे, योग्य उपचार व नियोजन करून शस्त्रक्रियेत मदत करणे, शेती, व्यापार, व्यवसाय, मार्केटिंग क्षेत्रात स्वयंचलित यंत्रणा व डेटाच्याद्वारे उत्पादन प्रक्रिकेत गती वाढली आहे. वाहतुक, आर्थिक व्यवहार, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांत ए. आय. ची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे.

            दैनंदिन जीवनात अनेक क्षेत्रांत ए. आय. ने मानवी बुध्दिला नवी दिशा दिली आहे. त्यामुळे मानवी श्रमाची बचत, अचूकता, कार्यक्षमता, वेग यामध्ये अमुलाग्र वाढझाली आहे.

            अशाप्रकारे ए. आय. ही केवळ तांत्रिक प्रगतीच नाही तर मानवी जीवनातील सर्वांगिण विकासाची एक संधी प्राप्त झाली आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0004

Download