राष्ट्रसंत तुकडोजींचे धार्मिक चळवळीत योगदान
प्रा. धनराज डी. मुरकुटे
मराठी विभाग
स.प. महाविद्यालय, चंद्रपूर
murkutedhanraj@gmail.com
मो. नं :- 9834624113
प्रस्तावना :-
जगाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांयांचा जन्म ३० एप्रील १९०९ अमरावती जवळील यावली नामक लहानशा खेडे गावी झाला. त्यांनी कृतिशिल कार्यातून व आपल्या साहित्यातून समाज परिवर्तनाचे कार्य केले. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतीक व धार्मिक कार्यात प्रत्यक्ष सहभाग दर्शविला व आपल्या साहित्यरूपी सेवेतून त्यांनी मोलाचे ‘योगदान’ दिले. राष्ट्रसंत तुकडोजींनी अनेक धार्मिक चळवळीत कृतिशील आंदोलने केली. महाराजांच्या आदेशाप्रमाणे श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी धार्मिक चळवळ राबविण्याचे कार्य केले. राष्ट्रसंतांनी मंदिर प्रवेश चळवळ राबविली. मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळालाच पाहिजे याकरिता महाराजांनी स्वतः चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. याची नोंद सुद्धा इतिहासात झालेली आहे.
बिजशब्द : मंदिर, समाज, चळवळ, प्रार्थना, मानवता, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्र, विश्व, संत.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2507I7VXIIIP0003
Download