शैक्षणिक क्षेत्रातील माहिती संकलनामधील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका आणि कार्य: संधी आणि आव्हान

शैक्षणिक क्षेत्रातील माहिती संकलनामधील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका आणि कार्य: संधी आणि आव्हान

प्रा. डॉ .रवींद्र श्रीहरी सोमोशी.

मराठी विभाग प्रमुख ,सुंदरराव मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यलाय  पोलादपूर जि.रायगड-४०२३०३.

somoshirs1972@gmail.com

गोषवारा :

प्रस्तुत शोधनिबंध शैक्षणिक माहिती संकलनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) भूमिका आणि कार्य यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच, तसेच सदर निबंधामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे शैक्षणिक क्षेत्रासंदर्भातील फायदे आणि तोटे यांची चर्चा करण्यात आली आहे. १९८० नंतर जन्मलेल्या भारतीयांसाठी संगणक आणि इंटरनेटच्या वाढीमुळे शिक्षणक्षेत्रात क्रांती झाली आहे. आज AI साधने विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना माहितीच्या सुलभ प्राप्ती आणि प्रक्रियेसाठी मदत करतात. जसं संगणक आणि इंटरनेट शिक्षण आणि कामाच्या क्षेत्रात आवश्यक झालं, तसंच AI आता संशोधन, परीक्षेची तयारी, प्रकल्प विकास आणि लेखनासारख्या दैनंदिन कार्यांना सोपं बनवत आहे. शिक्षण धोरणनिर्मिती आणि मूल्यांकनावर देखील याचा प्रभाव पडत आहे. मात्र, या सर्व फायद्यां प्रमाणेच, AI च्या वाढत्या वर्चस्वामुळे होणाऱ्या संभाव्य नकारात्मक परिणामांबाबत शिक्षण तज्ञांकडून सातत्याने चिंता व्यक्त केल्या जात आहेत.

कूट शब्द:

इंटरनेट ,कृत्रिम ,नेटवर्क ,बुद्धिमत्ता ,माहिती ,शैक्षणिक ,तंत्रज्ञान ,भाषा.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2506S01V13P012

Download