डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीयांच्या सक्षमिकरणात योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीयांच्या सक्षमिकरणात योगदान

संशोधक – प्रा. सुचिता इंगळे

पाली आणि बुद्धिझम विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर

सारांश :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गौरवतोच, पण त्यांच्या जीवनातील सर्वात गौरवशाली पर्व आहे ते हिंदू कोड बिल संघर्षाचे. भारतीय हिंदू स्त्रियांना हजारो वर्षांच्या भीषण अंधःकारातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. या बिलामुळे प्रत्येक स्त्रीला विवाह, वारसा, याबरोबरच दत्तकविधान, उत्तराधिकार, पोटगी, घटस्फोट यासंबंधीचे महत्त्वपूर्ण अधिकार मिळणार होते. ‘आंबेडकर स्मृती’ म्हणून ओळखले जाणारे हे बिल डॉ. आंबेडकरांना राज्यघटनेपेक्षाही महत्त्वाचे वाटत होते. कारण अतिशूद्र ठरविल्या गेलेल्या सर्व वर्षांच्या स्त्रियांचे ते मुक्तिगीत होते. बुद्ध धर्माने सर्वप्रथम स्त्रीच्या समानतेच्या अधिकारांचा पुरस्कार केला, पण नंतर येणाऱ्या हिंदुधर्मान धार्मिक ग्रंथांच्या साहाय्याने स्त्रीला संपूर्ण अधिकारांपासून वंचित केले आणि स्त्रीच्या अधोगतीची येथून परत सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रीच्या दयनीय स्थितीस कारणीभूत ठरलेल्या हिंदू धर्माच्या रूढी, रीती आणि परंपरांचा सखोल अभ्यास केला आणि अशा धार्मिक परंपरांचा विरोध व स्त्री अधिकारांचा पुरस्कार म्हणजे ‘हिंदू कोड बिल’. भारतीय स्त्रियांचे होत असलेले आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक शोषण पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत व्यथित होत असत. भारतीय स्त्रियांचा उद्धार झाल्याशिवाय देशामध्ये क्रांती होऊ शकत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणून त्यांनी स्त्रीयांच्या उन्नत्तीवर भर दिला. व भारतीय संविधानामद्धे स्त्रियाना हक्क आणि अधिकार मिळवुन दिले;त्यामुळे आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचे   योगदान दिसून येते.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2505I6VXIIIP0008

Download