राष्ट्रसंत तुकडोजींचे कृषी विषयक विचार
प्रा. धनराज डी. मुरकुटे
मराठी विभाग
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
मो. 9834624113
murkutedhanraj@gmail.com
प्रस्तावना :
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सत्तर टक्के जनता खेड्यामध्ये वास्तव करीत आहे. ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची हृदय असलेली ‘ग्रामगीता’ खेड्याला अर्थात शेतकऱ्याला अर्पण केली आहे. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही राष्ट्रसंताची वैचारिकता आहे. राष्ट्रसंत तुकडोजींनी आपल्या साहित्यातून कृषी विषयक विचार प्रगट केलेले आहे. भारत देश गुलामीत होता तेव्हापासून शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले व आपली लेखणी झिजवीली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रत्येकाला शेतकऱ्यांनी मिळवलेल्या अन्नावरच जगावे लागते. कोणताही कारखानदार, कंपनीवाला, पैसेवाला व कर्मचारी आपल्या कंपनीतल्या अथवा कारखान्यातील वस्तू खावून जगू शकत नाही. पैसेवाला व कर्मचारी पैसे खाऊन जगू शकणार नाही, तर त्यांना जगावे लागते ते शेतकऱ्यांनी घाम गाळून मिळविलेल्या अन्नावरच म्हणूनच राष्ट्रसंत म्हणतात जेव्हा शेतकऱ्याचे भले होणार तेव्हाच मी आनंद व्यक्त करेल, म्हणूनच महाराजांनी जिला हृदय म्हटलं अशी ‘ग्रामगीता’ शेतकऱ्याला अर्पण केली.
बिजशब्द : ग्रामगीता, शेतकरी, कृषीप्रदान देश, आदर्श ग्राम, कृषी विकास, समृद्ध देश.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2505I6VXIIIP0007
Download