स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रवादासंबंधी विचार

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रवादासंबंधी विचार

कुणाल दिलीप राठोड

संशोधक विद्यार्थी राज्यशास्त्र विभाग

प्रा. राजाभाऊ देशमुख कला   महाविद्यालय,  नांदगाव खंडेश्वर, जि.  अमरावती, 444 708

गोषवारा :

                        सावरकरांचे राजकीय विचार प्रामुख्याने स्वातंत्र्य संपादनासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार व प्रकार हिंदू राष्ट्रवादाची भावना यावर आधारित असे आहेत. ब्रिटिशांचे भारतीयांवरील वर्चस्व, ब्रिटिश अधिकारी वर्ग भारतीयांवर करीत असलेला जुलूम यामुळे त्यांना ब्रिटिशांचा तिरस्कार वाटत होता. सावरकरांची हिंदू राष्ट्राची कल्पना उदात्त विचारांवर आधारित असून ते एकदेश, एकसंस्कृती, एक भाषा व समान इतिहास आणि परंपरा या घटकांना अधिक महत्त्व देतात. त्यांच्या मते, भूमीनिष्ठा आणि धर्मनिष्ठा असेल तरच राष्ट्रवादी निर्माण होईल. सावरकरांचे राजकीय विचार हिंदू राष्ट्रवादाभोवती केंद्रीभूत झालेले होते. एका बळकट हिंदू राष्ट्राच्या उभारणीचे त्यांचे स्वप्न होते. आपली राष्ट्रीयत्वाची कल्पना स्पष्ट करताना ते म्हणत, केवळ एका देशात राहणे व समान भूप्रदेश एवढ्यावरच राष्ट्रीयत्वाची उभारणी करता येत नाही. त्यासाठी एका देशात राहणाऱ्या लोकसंख्या बरोबरच धार्मिक, वार्षिक, सांस्कृतिक समानता वा एक ते बरोबर भाषिक, तसेच जातीय व आर्थिक एकता असणे आवश्यक असते. एकत्र राहून राष्ट्रासाठी कोणताही त्याग करण्याची, कष्ट करण्याची तयारी व भावना असावी लागते.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/25050402V13P0005

Download