मानसिक ताण(तणाव) व त्यावर उपाय : एक संशोधनात्मक दृष्टिकोन

मानसिक ताण(तणाव) त्यावर उपाय : एक संशोधनात्मक दृष्टिकोन

डॉ. अर्चना आनंदराव निखाडे,

स्व. नि. पा. वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी /तुपकर

ता- लाखनी,जि- भंडारा. महाराष्ट्र.

ई-मेल :- archanagaidhane81@gmail.com

मो. नं. 9689512937

प्रस्तावना :-

मानवाच्या जीवनात मानसिक ताण तणाव हा एक सामान्य अनुभव आहे. आधुनिक धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये व्यक्ती सतत धावपळीत व्यस्त असतो. कमीत कमी वेळेत अधिकाधिक कामे करण्याच्या प्रयत्नामुळे व्यक्ती सतत ताणतणावात असलेली दिसून येते त्यातच हल्लीच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानवाला विविध मानसिक व शारीरिक आजार जडलेले आढळतात. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे व्यक्ती त्याला आलेल्या ताणाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन तो करू शकत नाही.

     आजच्या स्पर्धेच्या युगात ताण-तणाव ही अदृश्य स्वरूपात असलेली टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात तणावाचा अनुभव येतो.ताण तणाव ही एक सार्वत्रिक समस्या आहे यातील अल्पकालीन तणाव हे प्रेरणा देऊ शकतो परंतु दीर्घकालीन तणाव हे शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. त्याचप्रमाणे समाजातील अनेक समस्या व विकृतीचे ते मूळ असते. थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन हे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणजेच तणाव म्हणजे संथ गतीने मृत्यूकडे नेणारी एक व्याधी( आजार) आहे. त्यासाठी ताण म्हणजे काय? त्याचे परिणाम काय? त्यावर प्रभावी उपाय कसे करावेत त्याचा अभ्यास आपण या संशोधन लेखातून केलेला आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/25040401V13P0019

Download