भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्यांचे अध्ययन

भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्यांचे अध्ययन

डॉ. अरुण सदाशिव घायाळ

सहायक प्राध्यापक, वाणिज्य विभाग,

स्व. भास्करराव शिंगणे कला,  प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा.

सारांश :- कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत कृषी विपणन महत्वाचे असते. कृषी विपणनात अनेक कृषीमालाची खरेदी व विक्री होत असते.या कृषीमालात भाजीपाला उत्पादनाचे खूप महत्व आहे. कारण दैनंदिन खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक भाजीपाला असतो. कृषी विपणनात  भाजीपाला विक्रेता कृषीमाल विकत घेऊन ग्राहकांना त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करीत असतो आणि यावरच उदरनिर्वाह चालवीत असतो. भाजीपाला व्यवसायांमुळे रोजगार निर्मिती होते. तसेच शेतीक्षेत्र विकास होण्यास मदत होते. भाजीपाला विक्री व्यवसाय हा कमी भांडवलात करण्यात येणारा व्यवसाय असून आजमितीस अनेक लोक या व्यवसायात काम करीत आहेत. परंतु हा व्यवसाय करतांना भाजीपाला विक्रेत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भाजीपाला व्यवसायांसमोरील समस्यांचे निराकरण केल्यास अर्थव्यवस्था विकासाला चालना मिळते.

Keywords :-  कृषीक्षेत्र , कृषीमाल , कृषी विपणन  

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/25040401V13P0015

Download