पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे महिला सबलीकरण विषयक धोरण एक अध्ययन
प्रा.डॉ. ठकसेन दादारावजी राजगुरे
इतिहास विभाग प्रमुख स्वा.से.श्री.क.रा. इन्नानी महाविद्यालय, कारंजा (लाड) जि. वाशिम.
email-tdrajgureu@gmail.com Mob.No.9421794489
साराऊंश
मध्ययुगीन कालखंडात होऊन गेलेल्या शासकापैकी त्यातल्या त्यात स्त्री शासक असतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने राज्य कारभार चालवला यांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की त्यांची शासन पद्धती ही अत्यंत चोख आणि राज्यहीत साधणारी, प्रजेचे कल्याणकरणारी शासन व्यवस्था होती. या प्रजाहीतास प्रथम प्राधान्य देण्याच्या त्यांच्या तत्वामुळेच राज्यातील संपूर्ण प्रजेणे त्यांचे शासन मान्य करून प्रदीर्घ काळ टिकविण्यास मनापासून मदत केली. त्यांनी आपल्या शासन काळात आर्थिक बाजू कशी भक्कम राहील याकडे जातीने लक्ष दिले यामुळेच त्यांचा शासन काळ आर्थिक दृष्ट्या संप्पन्न होता. सोबतच त्यांनी तत्कालीन व्यवस्थेत स्त्रियांचे परा वलंबित्व दूर करून स्त्री सर्वच दृष्टीने कशी सक्षम होईल याकडे लक्ष पुरविले. स्त्रियांच्या सब्लिकरनाकरिता स्रियांना मुख्य प्रवाहात आणण्या करिता अनेक योजना आखून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. या त्यांच्या कार्यामुळे त्या प्रथम स्त्री उद्धारक म्हणून माणल्या गेल्यात. योग्य शासक आणि सोबतच स्त्री उद्धारक म्हणून त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे दिसून येते.
कळीचे मुद्दे.
जनकल्याण =राज्यातील सामान्यातील सामान्य जनतेचे हीत साधने. भटके =ज्यांना उत्पनाची कोणतीच साधने नाहीत अशी. निराधार =ज्यांना जगण्याकरिता कोणताही आधार नाहीत असे परित्यकता =पतीने सोडलेल्या स्त्रिया.हुंडा बंदी =विवाह प्रसंगी दिला आणि घेतला जाणारा व्यवहार बंद. स्त्रिदल =सैन्यात श्रीयांचा सहभाग. वडिलोपार्जित =आपल्या पूर्वजाणे कमवून ठेवलेले. कुटीरउद्योग =गृह उद्योग. महिलांश्रम =महिलांचे एकत्र राहण्याचे ठिकाण. अन्नछत्त्रालाय =गरजूना मोफत जेवण देण्याचे ठिकाण.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/25040401V13P0004
Download